ग्रामीण भागात कसा सुरू करता येईल पर्यटन व्यवसाय

ग्रामीण भागात कसा सुरू करता येईल पर्यटन व्यवसाय

हा व्यवसाय कसा वाढवला? ग्राहक कसे वाढवले? कसे टिकवले? पूर्ण वेळ व्यवसाय केला का?

पहिल्या ट्रीपनंतर त्या वर्षी आणखी दोन ट्रीप केल्या. आमचे भाडे इतरांपेक्षा कमीच होते. छोट्या छोट्या सुधारणा केल्या. इतर कंपन्या यात्रेत सकाळी चहा-नाश्ता व रात्री जेवण देतात. बाकी काही हवे असेल तर तुमचे तुम्ही करायचे. बर्‍याच लोकांना संध्याकाळी ४-५ वाजता चहा लागतो, इतर कंपन्या देत नाहीत. आम्ही तो देतो. लोकांना बरे वाटते. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपले नाव होते आणि ग्राहक जोडले जातात, वाढतात. या तिन्ही टूर दसर्‍याच्या अगोदर केल्या. दिवाळीच्या महिनाभर आधी मी बसने भीमाशंकर ते काशी विश्वनाथ व्हाया अयोध्या अशा सात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आलो आणि मग त्या टूरचे प्लानिंग केले. दिवाळीनंतर ५६ सीटर बस घेऊन सात ज्योतिर्लिंगाची पंधरा दिवसांची यात्रा केली. उत्तर भारताची यात्रा अवघड असते. रस्ते खराब, गुंडगिरी, रात्रीचा प्रवास करता येत नाही, पोलीस, हप्ते वगैरे प्रकार दक्षिण भारतापेक्षा जास्त आहेत. पैसे जास्त खर्चावे लागले, पण चांगले शिकायला मिळाले. दुसर्‍यांदा काहीच अडचण आली नाही.

त्यानंतर मी अष्टविनायक दर्शन करून आलो. अनुभव घेतला. अशा प्रकारे अष्टविनायक यात्रा सुरू केली. पुढे एकट्याने दुसर्‍या यात्रा कंपनीमधून यात्रा करून अमरनाथ, जगन्नाथ पुरी, बद्रीनाथ केदारनाथ यात्रा केल्या, अनुभव घेतला. या यात्रा ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांना कशा परवडतील अशा दरांचे गणित केले, माझा नफा कमी ठेवला आणि आता आम्ही दरवर्षी या सगळ्या यात्रा करतो.

लेखक- – एस. पी. नागठाणे (उद्योजक वक्ता)

7028963255

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!