चौफेर घोडदौड
माझी पहिली कार : ३६५
व्यवसायात मी अतिशय झटून काम करीत असल्याने अखिल भारतीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला. कंपनीच्या मुख्य कार्यायाने याची दखल घेत माझ्या व्यवसायाला पूरक ठरण्याच्या दृष्टीने औरंगाबादलाय कंपनीचे शाखा कार्यालय सुरु केले. माइयाकडे असलेले मोठे कार्यक्षेत्र व माझे काम पाहून कंपनीने नाशिक, जळगाव, नांदेड, कोल्हापूर, पुणे येणेही कार्यालये सुरू केली. त्यामुळे माझ्या मुंर्काच्या कार्यालयातील फेल्या वाचात्या पण त्याच वेळी व्यवसाय महाराष्ट्रात सर्वदूर विस्तारला होता. माझी भटकंतीही वाढली होती. माझी राजदूत चांगली पळत असल्ये, तरी लांबवरचा प्रवास करताना जरा जास्य व्हायचा, त्यामुळे मी स्वतःची चारचाकी कार घेण्याचे ठरविले १९८७ ला माझ्याकडे कार आली. ती होती मारुती-८००. कार घेतली व तिला आरटीओकडून नंबर मिळाला.३६५. मला कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची मतय आहे. ३६५ हा नंबर आल्यावर भी सहज विचार केला, एका वर्षाचे दिवस किती असतात, तर ३६५. माझ्या कारता हाच नंबर मिळण्यामागे कदाचित देवाला असे सांगायचे असेल की, ‘तू आता वर्षाचे सगळेच दिवस फक्त काम करायचं लीप इयरमध्ये फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा असतो. हाच चार वर्षातून एकदा येणारा ३६६ वा दिवस तुझ्यासाठी सुटीचा दिवस।’ मी आधीच व्यवसायात पूर्ण वाहून घेतले होते. त्यात कारच्या नंबरचा असा योग जुळून आल्यावर मी खूपच उत्साहित झालो.
आता माझी स्वतःची चारचाकी माझ्या दिमतीला होती. चारचाकीतून स्वतः ड्रायव्हिंग करीत फिरणे, गावोगावी मीटिंगला जाणे यामुळे जरा रुबाबदारच वाटत होते. पस्तीस वर्षांपूर्वी चारचाकी घेणे किवा बाळगणे आजच्या इतके सहज सोपे नव्हते. दारापुढे कार असली की, आजूबाजूच्या मंडळीवर जास्त छाप पडायची अशा काळात मी माझ्या लाडक्या ३६५ नंबरच्या कारने लाखो किलोमीटरचा प्रवास केला. त्यावेळी चोवीस तासांत औरंगाबाद-नागपूर-औरंगाबाद असा प्रवास अनेकदा केला. जवळपास ५५०-६०० किलोमीटरचा दुहेरी प्रवास मी करायचो. नागपूरला जाण्यासाठी मी पहाटे दोन वाजताच उठायचो. सवयीप्रमाणे अंघोळ वगैरे करून देवपूजा करायचो. पत्नी माझ्यासाठी एवढ्या पहाटे डबा करून द्यायची. पहाटे तीन वाजता मी गाडीचा सेल्फ मारला की, माझा प्रवास सुरू व्हायचा. त्या काळी औरंगाबाद ते नागपूर हा सिंगल रोड होता. त्यातही अमरावती ते नागपूर दरम्यान सगळा घनदाट जंगलाचा प्रदेश. मी आपला ड्रायव्हिंगचा आनंद घेत मार्गक्रमण करायचो गाडीत करमणुकीसाठी मी स्टिरिओ टेप लावून घेतला होता. त्यात मी कीर्तनाच्या कॅसेट लावायचो. बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन ऐकत ऐकत मी गाडी चालवायचो. कधी कधी प्रेरणादायी व्याख्याने ऐकायचो. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची अनेक उत्तम व्याख्याने मी गाडी चालविताना कॅसेट लावून ऐकली आहेत. अप्रतीम वक्ता, विचारांचे मोठे अधिष्ठान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून माझ्यासाठी शिवाजीराव भोसले कायम आदरणीय आहेत. त्याचसोबत माझ्याही भाषणाच्या कॅसेट मी सतत ऐकत असे. प्रवासादरम्यान कुठेतरी थांबून चहापाणी, जेवण, नाष्टा वर्गर करायचो, असा प्रवास करून मी साडेबाराच्या सुमारास नागपूरला सुमारास नागपूरला पोहचत असे. दुपारी २ ते सायंकाळी ५ पर्यंत मीटिंग घेणे, नंतर ७ वाजेपर्यंत अधिकाऱ्यांशी चर्चा करणे, कुठे काय अडचण आहे, कुठे काम कसे चाललेय याचा आढावा घ्यायचा, आवश्यक सूचना करायच्या. या बैठका संपल्या की, माझा नागपूरहून परतीचा प्रवास सुरू व्हायचा. रात्रभर ड्रायव्हिंग करीत मी पहाटे पाच-साडेपाचला औरंगाबादला घरी पोहचायचो. तब्बल एक हजार किलोमीटरचा प्रवास तोही २७-२८ तासांत असे अनेक दौरे मी केले. या काळात तास दोन तास झोप घ्यायची. मग सगळ आवरून परत बरोबर दहा वाजता बँकेत हजर व्हायचो.
त्या काळात मी कारने सगळा महाराष्ट्र पालथा घातला. विदर्भात तर अनेक चकरा मारल्या. रात्रीअपरात्री कारने निर्जन रस्त्यावरून जायचो. पण या सगळ्या प्रवासात रात्रीच्या वेळी माझ्या कारने मला कधी दगा दिला नाही. आडरानात, निर्जन रस्त्यावर गाडी पंक्चर होणे किंवा बंद पडणे असा प्रकार कधीही झाला नाही. दिवसा प्रवास करताना काही तांत्रिक गोष्टी विघडल्या. पण शंभू महादेवाच्या कृपेने रात्री अपरात्री अशी अडचण कधीच आली नाही. आईवडिलांचे आशीर्वादही तितकेच पाठीशी होते म्हणा. अशी ही माझी ३६५ नंबरची कार माझ्या उत्कर्षांत मोठे योगदान देणारी ठरली. ३६५ नंबर हा इतका फेमस झाला होता की, त्या नंबरवरून लोकांना माझे
लोकेशन कळत असे. ३६५ आली, ३६५ इयं दिसली महणजे धुमाळसाहेब इकडे इकडे दिसले वरं का… अशा चर्चा व्हायच्या. या नंबरशी इतके घट्ट नाते तयार झाले होते त्यामुळे पुढे जेव्हा केव्हा मी नवीन कार घेतली, दुचाकी घेतल्या, तेव्हा मी त्या गाण्यांसाठी आवर्जून ३६५ हा नंबर घ्यायचो. धुमाळ परिवाराकडील गाडी म्हणजे नंबर ३६५ च असणार असेच जणू समीकरण तयार झाले आहे. मारुती ८०० नंतर मी अनेक मोठ्या मोठ्या गाळ्या घेतल्या. पण आजही मारुतीची आठवण जास्त येते. ती कार घेतल्यावर मी गावी गेलो होतो. आमच्या घरातील ती पहिलीच चारचाकी होती. त्या वेळी आजोबांची आठवण झाली. त्यांनीच मला कशात काही नसताना स्वप्न दाखविले होते की, आपल्या दारापुढे चारचाकी (जिपर्ड) लागली पाहिजे. आजोबांची ती स्वप्नपूर्ती झाली. कार घेतल्यावर मला जितका आनंद झाला नाही, तितका आनंद आजोबांना ती जीप पाहून झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावरील ते समाधान, त्यांच्या डोळ्यात माझ्याबाबत दिसणारा अभिमान आजही आठवतो व मन हळवे होते.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
