जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

९. माणसं हाताळण्याचं कौशल्य

महाराजांच्या आयुष्यावर एक नजर टाकली तरी आपल्या लक्षात या गुणाचं महत्व आल्याशिवाय राहणार नाही. महाराज १२ वर्षाचे असताना बंगळोरहून पुण्याला आले आणि लोकांच्या गावात, वाड्यावर, तांड्यावर, पाड्यावर जाऊन त्यांना भेटू लागले. त्यांची विचारपूर करुन त्यांचे प्रश्न सोडवू लागले. पुढच्या काही वर्षात लोक आपली तक्रार, गाऱ्हाणी, अडचणी घेऊन खेडशिवापूर आणि लालमहालात येऊ लागले.
महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई जी मला जाणवली ती म्हणजे महाराजाकडे एकया जोडला गेलेला माणूस कायम मरेपर्यत महाराजांच्या सोबतीला उभा राहिला. स्वार्थ, संकट, यांची पर्वा न करता ही माणसं महाराजासाठी जगायला आणि मरायला एका पायावर उभ्या हयातभर तयार राहिली. हेच ते महाराजाचं मोठेपण महाराजांना मोठं करुन करुन जात आणि आमची परिस्थिती एवढी भयाण की सकाळची सोबत करणारा संध्याकाळपर्यंत टिकत नाही आणि नेतेही तसेच एक दिवस एका तंबूत टिकत नाहीत. यथा राजा तथा प्रजा आणि यथा प्रजा तथा राजा बाकी काय ।

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!