स्वयंप्रेरित बना : Self motivation

४.स्वयंप्रेरित बना : Self motivation

तुम्हाला युरोपला जाण्याची इच्छा आहे, परंतु केवळ इच्छेन भागत नाही, त्यासाठी निर्धार हवा. अर्थात Burning desire व तोच निर्धार मिळतो स्वयंप्रेरणेने अर्थात मोटिवेशनमुळे. मोटिवेशन शब्दातील मोटीव म्हणजे ध्येय किंवा गोल. ते ध्येय प्राप्तीसाठी स्वयंप्रेरित बना. असे मोटिवेशन एक दिवस घेऊन चालणार नाही. आपण रोज मोबाईल चार्ज किंवा अंघोळ करतोच ना. त्याप्रमाणेच आपल्या विचारांनाही रोज चार्ज करावे लागेल. त्यासाठी लागते लर्निंग आणि Learning is equal to earning. त्यासाठी तुम्ही दररोज २०-३० मिनिटे आपल्या हिरोसोबत रहा. त्याचे विचार, अनुभव व चरित्र यांचे पुस्तक वाचावे लागेल. त्याचे दोन पाच मिनिटांचे व्हिडिओ पाहवे लागतील. आठ-पंधरा दिवसांतून अशा काही यशस्वी व्यक्तींना भेटा ते तुम्हाला मार्ग दाखवितील. त्यासाठी स्वयंप्रेरित होऊन यशस्वी व्हा.

 

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

 

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:                                   https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!