5. Studying Alternative पर्यायी योजनेचा अभ्यास करा
आता आपण आपले निश्चित ध्येय गाठण्यासाठी जे वेगवेगळे पर्याय शोधले त्याचा पर्यायी अभ्यास करा. ते सर्व पर्याय अभ्यासताना कोणता मार्ग आपल्याला कमी बाकि खर्चाचा, कमी वेळेत कापता येणारा, कोणता मार्ग कमी धोकादायक आणि कोणता मार्ग सर्वाधिक लाभदायक असू शकतो याचं विश्लेषण करा. प्रत्येक पर्यायाच cost- benefit analysis म्हणजे फायदा-तोट्याचं गमक अभ्यासा. कारण कधी कधी असं होतं की एखादा प्लॅन महागडा, जीवघेणा ठरु शकतो. पण त्याचवेळी तो तेवढाच फायदेशीरही जीव वाचवणाराही ठरु शकतो आणि दुसरा एकादा प्लॅन साधा सोपा असू शकतो पण त्यामुळेच तो तेवढाच कमी फायद्याचाही ठरु शकतो. आपणाला या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करुनच योग्य पर्याय निवडावा लागेल. उदा. महाराजांनी पन्हाळ्यातून बाहेर पडण्याच्या वेगवेगळ्या मार्गांची हेर पाठवून अगोदर माहिती घेतली. मग त्या वाटाचा-मार्गाचा पर्यायी अभ्यास केला आणि मग त्यातील जोखीम, फायदे, तोटे लक्षात घेऊनच महाराज अत्यंत दुर्लक्षित अशा परंतु तेवढ्याच अवघड वाटेने जाण्याचा निर्णय घेतात आणि त्यानुसार विशाळगडावर सुखरुप पोहचतात. आग्ग्रातून बाहेर पडण्यासाठी महाराज असेच तीन पर्यायी योजना बनवून यशस्वीरित्या सुखरुप राजगडावर पोहचले हे आपल्याला माहीतच आहे.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W
