६.संस्कार आणि गरुड झेप !
जर त्याने पंख नाहीत तर जमिनीच्या काही इंचांवरून त्याची आई त्याला पकडते, पुन्हा उंच घेऊन जाते व पुन्हा सोडून देते. जोपर्यंत ते गरुडाचे पिल्लू उडणार नाही तोपर्यंत हा सिलसिला चालूच असतो.
गरुडाला त्याचे व्हिजन पक्के माहीत असते. त्यावरच तो फोकस करतो. त्यामुळे जेव्हा मोठे वादळ निर्माण होते, तेव्हा गरुड उंच उंच उडत जाऊन ढगाच्याही वर जाऊन, पंख पसरून, वाऱ्याच्या दिशेने झेपावून देतो व आराम करतो. गरुडाला साधारण ७० वर्षे आयुष्य असते. परंतु ४० वर्षांनंतर त्याची चोच व नखे वाकडी होतात व पंख खूपच जड होतात. त्यामुळे त्याला शिकार करणे आणि उंच उडणे अवघड जाते. त्यावेळी हा गरुड उंच डोंगरावर, एखाद्या खडकावर बसून, दगडावर चोच व नखे आपटून आपटून रक्तबंबाळ होऊन ते तुटून पडतात. त्यानंतर त्याला नवीन चोच व नवीन नखे येतात. गरुड आपल्या चोचीने त्याचे जड झालेले पंख उपटायला सुरुवात करतो. खूप वेदना होत असतानाही सर्व पंख उपटून टाकतो. त्यानंतर सहा महिन्यांत त्याला नवीन पंख आलेले असतात. तेव्हा तो पुन्हा गरुडभरारी घेण्यासाठी तयार होतो आणि पुढची तीस वर्षे पुन्हा राजासारखे जीवन जगतो. म्हणूनच त्याला पक्ष्यांचा राजा म्हणतात.
मित्रांनो आपला जन्मही सर्वोत्कृष्ट मानव जातीत झाला आहे. पूर्वीच्या काळात मुलं गुरुंच्या घरी जाऊन शिक्षण घेत व सर्वगुणसंपन्न होत. लहान वयातच त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायचे. आपणही चांगले संस्कार मिळवून आपल्या जीवनात यशाची गरुडझेप घेऊ शकतो व राजासारखो जीवन जगू शकतो. असेच जीवन जगा.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
