१. Simplicity : सुटसुटीत/सोपं
नियोजन असं असावं की ते साध्या माणसालाही सहज कळून आले पाहिजे त्या नियोजनातील Facts आणि figure व्यवस्थित दिल्या दाखविता आल्या पाहिजेत जेणेकरुन काय तर ज्याने नियोजन अंमलात आणायचे त्या व्यक्तीला ते नियोजन व्यवस्थीत कळले पाहिजे. कारण नियोजन करणारे वेगळे असतात आणि त्याची अंमलबजावणी करणारे वेगळे असतात. नियोजन बनविणारे ते साधे सुटसुटीत बनविले आणि तेवढ्याच साधेपणाने जर अंमलबजावणी करणारा समजावले तर नियोजन १००% यशस्वी होते. चांगली योजना असून जर ती व्यवस्थीत कळली नाहीतर त्या योजनेचा बोजवारा उडून सगळे नुकसान होऊ शकते. महाराजांची जावळीची दुर्गम मोहीम पक्क्या नियोजनामुळेच सुगम झाली आणि सहा वर्षात देखील ज्यांचा पराभव होणे शक्य नव्हते ते मोरे आणि जावळीचे खोरे सहा तासात महाराजांच्या ताब्यात आले. कारण नियोजनातील सुटसुटीतपणा.
२. Flexibility: लवचिकता
नियोजन कधीही कठोर नसावे Plan must not be rigid. नियोजन कधीही लवचिक असेच असले पाहिजे. जेणेकरुन जर काही आवश्यकता निर्माण झाली तर त्यात ताबडतोब काही बदल करता आले पाहिजेत. नियोजन करतानाची परिस्थिती आणि आता अंमलबजावणीची वेळ यात जर अचानक काही तफावत येऊ शकणारी स्थिती निर्माण झाली तर त्या दुरुस्तीसाठी जागा असावी याला म्हणतात लवचिकता. उदा. लाल महालावरील महाराजांचा छापा यात नियोजनातील प्रासंगिक बदलांना महाराजांनी जागा ठेवली होती.
३. Suitability: योग्यता
चांगले नियोजन त्यालाच म्हणावे की जे ज्या कामासाठी बनविले आहे त्यासाठी योग्य असले पाहिजे. म्हणजे काय तर साधन सामग्री आणि लोकांची क्षमता पाहूनच ध्येय निश्चित केले पाहिजे. म्हणजे काय तर Over targeting किंवा Under targeting हे दोन्ही टाळले गेले पाहिजे. उदा. प्रतापगड रणसंग्रामाच्या वेळी महाराजांनी जीवा महाले आणि संभाजी कावजीत को हाहाकार आला विशेष अंगरक्षक म्हणून योग्य अशीच जबाबदारी दिली. निकाल तुम्हाला माहीतच
४. Acceptance : स्वीकार
ते नियोजन आपल्या हाताखालील लोकांना स्विकारता येईल असे पाहिजे त्यामुळे नियोजन करतानाच सहकाऱ्यांशी विचार विनिमय करुनच ध्येय किंवा टारगेट ठरविले गेले पाहिजे किंवा नियोजन करणाऱ्या व्यक्तीला ते अंमलबजावणीत सहभागी कर वारविले समजावता आले पाहिजे.
५. Facilitate Organizing: जुळवाजुळव
एक चांगलं नियोजन आपल्याला साधन सामग्रीची जुळवाजुळव करण्याची दु शक्ती देते किंवा क्षमता अंगी बाणवते. त्यामुळे नियोजन करण्याच्या अनुभवी रात प्रक्रियेतील माणसाला अडचणी येत नाहीत किंवा त्या फारच कमी येतात. मग ती ल भौतिक साधनं असोत की मनुष्यबळ असो. म्हणजेच काय तर नियोजनानुसार आणि नियोजनामुळे आपल्याला योग्य माणसं आणि साधने यांची जुळवाजुळव करण्यात यश येते.
६. Provide Direction : दिशा देणे
योग्य नियोजन आपल्याला दिशा देते. कारण नियोजन एक नकाशाप्रमाणे आपले मार्गदर्शकाचे काम करते. वेळ काळ दिशा सगळं काही आपल्याला माहीत असल्याने सगळं काही व्यवस्थीत होते.
७. Facilitate control: नियंत्रण करता येते
एक चांगल्या नियोजनामुळे कार्यावर चांगले नियंत्रण करता येते. आपलं नियोजन ठरलेलं असतं त्याप्रमाणे आपण अंमल बजावणीसाठी ताकद लावतो आणि त्याप्रमाणे कामकाजाच मूल्यमापन केलं जाते जेणेकरुन नियोजन आणि अंमलबजावणी यातील फरक आपणाला मोजता येतो आणि त्याप्रमाणे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ती नियंत्रणाची प्रक्रिया राबविता येते. थोडक्यात काय तर चुलीचा जाळही होऊ नये आणि चूल विझूही नये याची काळजी घेणे. दुध तापले तर पाहिजे पण उतू गेलं नाही पाहिजे. योग्य काम योग्य दिशेने योग्य प्रमाणात होत नसेल तर ते वेळेत आवरणे म्हणजे नियंत्रण आणि हे चांगल्या नियोजनामुळे शक्य होते. चांगलं नियोजन असणाऱ्या गृहिणीच्या घरास दूध उतू जाण्याचा प्रसंग घडत नाही आणि नियोजन न करणाऱ्यांच्या घरी तेले उतू जाऊन मातीत मिसळल्याशिवाय राहत नाही.
८. Harmony generation:
एका चांगल्या नियोजनामुळे लोकांचे चांगले संबंध निर्माण होऊन त्यांच्या मध्ये एका चांगली अशी संघभावना निर्माण होते. कारण नियोजन म्हणजे फक्त एकत्र येणं नसते तर एकत्र चालणं आणि एकत्र पोहचणंही असतं आणि सर्वाच्या एकजिन्सी पणावरच ध्येयाची प्राप्तीची होते. कारण हा एकट्या माणसाचा एकट्या विभागाचा. तुकडीचा खेळ नाही. अत्यंत सोपे आणि समजण्यासारखे उदाहरण दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम. विविध विचारांची विविध जडणघडणीची सगळी पोरं आपले व्यक्तीगल मतभेद, हेवेदावे विसरुन एका संघ भावनेने काम करुन हंडी फोडण्यात यशस्वी होतात.
९. Generate efficiency: कार्यक्षमता निर्माण होते
एक चांगलं नियोजन माणसाला आपल्याकडे असलेल्या साधन सामग्रीचे सर्वात चांगले उपयोग करायला शिकवते आणि त्याच वेळी खर्च आणि नुकसान कमीत कमी ठेवण्यात सक्षम बनविते.
१०. Motivate Personnel: लोकांना प्रेरणा मिळते
एक चांगलं नियोजन हे नेहमी वास्तवदर्शी आणि आव्हानात्मक असतं. म्हणजेच काय तर एक चांगलं नियोजन करणाराच कसब पणाला लावलं तर अंमलबजावणी करणारीची शौर्य, बुद्धीमत्ता, धाडस सगळं काही पणाला लागत असतं आणि असं आव्हानात्मक कामच सहकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम करत असतं.
नियोजनामुळेच मोठमोठी कामे हाती घेतली जातात आणि अशा जागतिक किर्तीच्या उपक्रमामध्ये काम करायला लोकांना आवडतं कारण यातून त्यांना नाव, पैसा, प्रसिद्धी आणि समाधान सगळं काही मिळण्याची शक्यता असते. आणि जेव्हा माणसाला या चारही गोष्टी मिळणे शक्य वाटतं तिथंच माणसे हात घालतात. कारण प्रेरणा ही त्या मागची किल्ली असते.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W
