नोकरीचा राजीनामा : नवी मुहूर्तमेढ
‘तो’ पुढे जाणारा मीच आहे!
मी घरी आलो. मधल्या काळात खूप विचार केला. दहाव्या दिवशी मी त्यांना भेटायला बँकेत गेलो. ते म्हणाले, “मी दिलेला सल्ला तुला पटलेला दिसतोय.” त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते, “फाडून टाकू का तुझा राजीनामा?” मी म्हणालो, “सर, थांबा. तुमच्या सल्ल्यानुसार मी मागील नऊ-दहा दिवस खूप विचार केला. रात्रीची झोप उडाली. रात्ररात्र विचार करूनही मला उत्तर मिळत नव्हतं. काल तर मला रात्रभर झोपच आली नाही. आपण मला सांगितलं की, दहापैकी सात जण रस्त्यावर येतात. दोघे तिघे रडत पडत जगतात. एकच पुढे जातो. मागचे दहा दिवस मला दररोज पहाटे पहाटे एकच चित्र दिसत होतं. एक जण पुढे चालला आहे. त्यात माझे आजोबा मला सांगत होते, की तो पुढे जाणारा तूच आहेस. मी खूप बारकाईनं पाहिलं, तर मलाही दिसलं की, तो पुढे जाणारा मीच आहे. सर, मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही ब्राह्मण आहात. आपल्या संस्कृतीत ब्राह्मणाच्या आशीर्वादाला महत्त्व असतं. तो आशीर्वाद तुम्ही मला द्या व माझा राजीनामा मंजूर करा.” माझा हा निर्धार व दृढनिश्चय पाहून मॅनेजरसाहेबही थक्क झाले. त्यांनी मला तोंड भरून आशीर्वाद दिला व ‘तू नक्की यशस्वी होशील’ असा विश्वास व्यक्त केला.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
