महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती

महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी दुरध्वनी, भ्रमणध्वनी, फॅक्स किंवा सॅटेलाईट फोन अशा संदेश वहन करणाऱ्या आधुनिक यंत्रणा अस्तित्वात नव्हत्या. तरीही या जाणत्या राजाने आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग करुन खुप चांगल्या प्रकारची संदेशवहन व संपर्क यंत्रणा उभारण्यात आणि राबविण्यात यश मिळविले होते.

आजही जगातील सर्वात वेगवान अशा समजल्या जाणाऱ्या दोनच शक्ती शास्त्रज्ञांना अभिप्रेत आहेत. त्या म्हणजे ध्वनी आणि प्रकाश. आज सर्वात वेगाने उड्डाण करणारे विमान ध्वनीच्या गतीवरुन मोजले जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जन्मापुर्वी डोळसपणे याचा उपयोग हिंदवी स्वराज्यासाठी करणारा राजा शिवाजी हा एक वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगणारा राजा म्हणुनही आता आपणा समोर येऊ शकेल.

आपणाला शिवाजी महाराजांची संदेशवहन यंत्रणा समजण्यासाठी उदाहरण दाखल एक – एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया दिवसाही होत आणि काळोख्या रात्रीही होत. त्यामुळे दिवस आहे की रात्र याचा विचार करुन संदेशवहन यंत्रणा काम करीत होती. आणीबाणीच्या आणि इतर प्रसंगी एका किल्यावरुन दुसऱ्या किल्ल्यावर त्वरित संदेश पोहोचविण्यासाठी महाराजांनी अंमलात आणलेली पद्धत खरोखरच आपणाला थक्क करून सोडणारी आहे.

त्यावेळचे सर्वात वेगवान वाहन म्हणजे घोडेस्वारी. परंतु या संपर्क यंत्रणेच्याही विशिष्ट प्रसंगी खुप मर्यादा येतात. उदा. शत्रुने वाट रोखुन धरली किंवा शत्रुने किल्ल्याला वेढा घातला असेल अशा प्रसंगी तर या संपर्क यंत्रणेवरच पुढील हालचाली आणि युद्धाचा निर्णय अवलंबुन असतो आणि त्यामुळे त्यावेळच्या इतर राज्यकर्त्यांच्या सहसा लक्षात न आलेली संपर्क यंत्रणा मात्र जाणत्या राजाने जाणीवपुर्वक उभारुन माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची मुहुर्तमेढ रोवली असेच म्हणावे लागेल.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!