योग्य निवड करा
यश आणि यश कसे असतं, ते कोणाला मिळतं, त्याचे उत्तर आहे, हे यश कोणाही ऐऱ्यागैऱ्याला मिळत नाही. ते त्यांनाच मिळते, ज्यांना ते अंतर्मनापासून हवं असतं. म्हणूनच म्हणतात आत्म्याची ग्वाही त्रिभुवनात नाही. अंतरात्म्यापासून निघालेला विचार, हा थेट यशाकडे घेऊन जातो. म्हणूनच यशासाठी तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा किंवा मिळालेल्या क्षेत्रात आवड निर्माण करा आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी व्हा.
आपण स्वतःहून आपलं क्षेत्र निवडणे किंवा वाडवडिंलाकडून आपल्याला क्षेत्र मिळणं यामध्ये खूप मोठा फरक असतो. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडणारे निश्चितच अटकेपार झेंडे रोवतात. परंतु वारशाने मिळालेल्या क्षेत्रात यश मिळेलच असं काही सांगता येत नाही. धीरूभाई अंबानी यांनी डिझेल पंपावरती पेट्रोल भरताना पेट्रोल पंपाचे नव्हें तर पेट्रोल कंपनीच काढण्याचे स्वप्न पाहिलं आणि रिलायन्स इंडस्ट्रीची स्थापना करून प्रचंड यश मिळविलं. पण त्यांची मुले मुकेश आणि अनिल अंबानी यांना त्यांचे क्षेत्र निवडायची गरज पडली नाही तर त्यांना ते आपोआपच विरासत मध्ये मिळालं. त्यापैकी मुकेश अंबानी यांनी मिळालेल्या क्षेत्रात आवड निर्माण करून वडिलांपेक्षाही मोठे यश मिळविलं. पण अनिल अंबानी मिळालेल्या क्षेत्रात आवड नसल्याने त्यांनी बॉलिवूडमध्ये टाईमपास केला आणि मिळालेल्या विरासतचे वाटोळे करून रस्त्यावर आला.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
