संघर्षातून यशाकडे
जीर वन का इम्तिहान आसान नही होता ! और बिना संघर्ष से कोई महान नही होता ! जब तक न पडे हातोडी की मार, तब तक पत्थर भी भगवान नही होता !मी सकाळी फिरायला गेलो असता, एक मूर्ती बनविणारा, एका दगडावर बसून हातोड्याने ठोके मारत होता. मी विचारले काय करतोस ? तर तो म्हणाला, मी बजरंगबलीची मूर्ती बनवित आहे. मी म्हणालो, बजरंगबली तर सर्वात ताकदवान देव आहे आणि तू त्याच्यावर बसलास. तू काय बजरंगबलीपेक्षा जास्त ताकदवान आहेस का? त्यावर तो म्हणाला, साहेब हा देव नाही. फक्त एक दगड आहे. तेवढ्यात त्याने बिडी ओढली आणि
दगडावरच विझवली. मी म्हणालो अरे देवाला चटका बसेल ना? तो परत म्हणाला साहेब, हा फक्त दगड आहे. याला देवपण येण्यासाठी आम्ही अगोदर एक चांगली शिळा निवडतो. त्यावर मोठ्या घणाने ठोके टाकतो. दगड फुटला तर फेकून देतो. दुसऱ्यावर परत तोच प्रकार करून त्याला शेपमध्ये आणतो. नंतर छोट्या छनी हातोड्याने हात, पाय, नाक, डोळे तयार करून मूर्ती बनवितो. तो पर्यंत ती आडवी असते. त्यानंतर आम्ही ती मूर्ती उभी करून त्याला शेंदूर लावतो आणि सर्वप्रथम आम्ही त्याची पूजा करतो. नंतरच तुम्ही त्याला देव मानता.
याचा अर्थ देवालाही देवपण मिळविण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. आपण तर हाडामासाची माणसे आहोत. आपल्याला यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि संघर्ष तर करावाच लागेल, त्याची तयारी ठेवा आणि यशस्वी व्हा.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
