3. Setting the objectives ध्येय ठरवा
नियोजन करण्यातील तिसरी पायरी म्हणजे आता आपण आपले ध्येय ठरवू शकतो. एकदा का आपल्याला आपली ताकद कमजोरी संधी आणि धोका कडून अपर की मग आपण आपलं ध्येय ठरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण जे आपले ध्येय किंवा objective ठरवायचे ते कसं स्मार्ट असंच असलं पाहिजे. स्मार्ट म्हणजे स्मार्टच
S- Specific निश्चित असं
M- Measurable मोजमाप करता येईल असं
A- Achievable पूर्ण करता येईल असं
R-Realistic वास्तववादी असं
T-Time bound निर्धारीत वेळेचं असं
आता कळलं ना स्मार्ट लोकांचं ध्येय कसं स्मार्ट असते ते उदा. शिवाजी महाराजांनी ठरवलेलं ध्येय म्हणजे स्वराज्य. साधं नाही पण Specific निश्चित असं ध्येय होय. मोजता येण्यासारखं म्हणजे गडकोट शस्र सैन्य यातून ते मोजता येणार. Achievable म्हणजे प्राप्त करण्यासारखं आणि त्या काळातील ती लोकांची गरज ओळखून म्हणजेच काय तर वास्तविकतेवर आधारीत Realistic असं होतं आणि विशेष म्हणजे ते निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचं ध्येय होतं. महाराजांच्या हयातीतच ते सहा वर्षाअगोदर पूर्ण केलं गेलं अस ध्येय होतं.
अर्थात ध्येय जेवढं मोठं तेवढ्या यातना जास्त, कष्ट जास्त आणि नियोजनही तेवढचं तगडं लागतं आणि अशा तगड्या नियोजनाच्या बळावर सहकाऱ्यांच्या तगड्या पाठबळाने, निश्चीत मनसुब्याने महाराजांनी ५-५ प्रस्थापित शाह्या पालथ्या घालून स्वतःच राज्य स्वराज्य उभे करुन वयाच्या ४४ व्या वर्षीच राज्याभिषेक करुन दाखविला.
आपली ध्येये सोपी आणि छोटी असू शकतात. अरे छोटी का होईना पण आयुष्यात काहीतरी ध्येय ठेवा ना! आणि आणखी एक लक्षात ठेवा छोटी-छोटी ध्येय गाठणाराच मोठी ध्येय ठरविण्याची धमक ठेवतो तेव्हा आतापासून ध्येय ठरवायला सुरुवात करा. मी पास होईन इथ पासून ते मी श्रीमंत होईन इथपर्यंत काहीही पण निश्चित असं ध्येय निश्चित करुन निश्चित वाटेने प्रवास करुन ते निश्चित ध्येय, निश्चित वेळेत गाठा बरं. तुमची कौतुकानं पाठ थोपटायला महाराज स्वतः तुमच्या पाठीशी उभे असतील. तेव्हा आता काळजी दूर करा आणि ध्येय जवळ करा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
