सुशिक्षित शिवाजी महाराज

सुशिक्षित शिवाजी महाराज

शिवाजी महाराजांच्या साक्षरतेबाबत इतर मंडळी काय म्हणतात ते पहा, कोस्मी द ग्वार्द, “तो लोकांमध्ये पायी फिरला. त्याला त्यापैकी कोणी ओळखले नाही. आपल्या तलवारीवर रेलून तो घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेत असे. जे महत्वाचे मुद्दे तो (एरवी) विसरला असता ते तो आपल्या तळहातावर टिपून घेत असे. त्याकरीत तो स्वतः बरोबर नेहमी दौत बाळगीत असे.”

हा प्रसंग आहे औरंगजेबाने शाहिस्तेखानाची स्वराज्य विरोधात नेमणूक केली त्यावेळी राज्यकारभाराची व्यवस्था लावण्यासाठी महाराज ज्या हालचाली करत होते त्यावेळची. खाफिखान हा मोगल इतिहासकारही याबाबत लिहून गेलेला आहे. “प्रवासात संभाजी थकून गेला तेव्हा शिवाजीने त्याला अलाहाबाद येथे एका ब्राह्मणाकडे ठेवले. या ब्राह्मणाच्या दख्खनमधील नातेवाईकाचा शिवाजीच्या वडीलांशी जवळचा संबंध होता आणि शिवाजीच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील पत्र मिळेपर्यंत त्या ब्राह्मणाने संभाजीला स्वतःच जवळ ठेवावे अशी सूचना शिवाजीने त्याला दिली होती. त्या ब्राह्मणाचे नाव कवी कलश होते असे खाफिखानाने म्हटले. आग्र्याहून महाराजांची सुटका आणि त्यानंतरचे हे भाष्य.

त्यानंतर चिटणीस बखरीतील उल्लेख हा असा, “शहाजी महाराज जहागिरीत गेले. तिकडेच राहिले. जिजाबाईसाहेब व पुत्राचे भेटीस फार दिवस झाले. सात वर्षाचे वय झाले. त्यास अवलोकन करावे अशी इच्छा शहाजी महाराजांना झाली. ७ वर्षात सर्व विद्याभ्यास केला. बहुत स्वरुपे करुन सुंदर गुणवान लिहिणे, घोड्यावर बसणे, तालीमखाना, शस्त्रविद्या, तिरंदाजी करणे, बंदुक मारणे, शास्त्र अभ्यास, या सही प्रारंभ केला. बोलणे व कल्पना चातुर्य बहुत. ऐसे गुण श्रवण करुन शहाजी महाराज बहुत उत्कंठीत होते. इकडे महाराज शहाजी राजे यांनी शिवाजी राजे यांस विजापूरी नेलियावर जैसे गुण ऐकीण्यात आले त्याहून अधीक गुणवान विद्याभ्यास जो करविला तो शिघ्र आणि प्रयास न करीता साध्य व्हावा असे पाहून फारच हर्षायमान झाले.
आता शिवाजी महाराजांना अशिक्षित होते असे म्हणण्यामागे नक्की काय डाव आहे याचा उल्लेखही इतिहासात आहे. हेन्री रेविंग्टन याला शिवाजी महाराजांनी सोनगड येथे कैद करुन ठेवले होते. त्याच्या सुटकेबाबत इंग्रजांनी अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!