सुशिक्षित शिवाजी महाराज

सुशिक्षित शिवाजी महाराज

सुरत कौन्शीलला पाठविलेल्या १० जून १६६१ या तारखेच्या पत्रात हेन्री म्हणतो, “हसनने किंवा जो दुसरा कोणी शिवाजी करीता पत्र घेऊन येईल त्याने शिवाजी कुठे आहे याची वसईपाशी चौकशी करावी आणि पत्र तिथे देऊन त्याच्या स्वतःच्या हातात द्यावे, कारण हे ब्राह्मण त्यांना पाहिजे ते पत्राकडून वदवून घेतात. (म्हणजे पत्रातून वाचून दाखवतात) अशी शंका आम्हाला वाटते त्या पत्राची इंग्रजी नक्कल आम्हाला पाठवा. शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत होते म्हणून हेन्री असे म्हणतो थेट पत्र महाराजांच्या हातात द्यावे आणि कारकुनाच्या हाती का देऊ नये तेही सांगतो. शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांची चेष्टा करणारा एक संस्कृत श्लोक पंडीताकडून लिहून घेऊन पाटविला तेव्हा शिवाजीनेही त्यावर प्रतित्युरादाखल एक संस्कृत श्लोक शाहिस्तेखानाकडे पाठविला असे ९१ कलमे बखरीत म्हटले आहे.

आणि या उपरही शिवाजी महाराजांच्या साक्षरतेवर जर हरामखोर विद्वानांना प्रश्न असेल तर त्यांच्या माहितीसाठी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करणारा गागाभट्ट आणि समकालीन कवी वामन पंडीत यांनी पुष्कळ ग्रंथ लिहिलेले आहेत. पण हस्ताक्षरे मिळालेली नाहीत. कृष्णजोतीशाने शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार रचलेला कर्णकौस्तुब ग्रंथ उपलब्ध आहे. पण त्याचे हस्ताक्षर मिळालेले नाही.

शिवभारत उपलब्ध आहे परंतु परमानंदांचे हस्ताक्षर मिळत नाही. महंमद आदिलशहा, दुसरा अलीआदिलशहा, सिकंदर आदिलशहा, अब्दुल्ला कुतुबशहा, अबु हसम, उर्फ तानकशहा या शिवाजी महाराजांच्या समकालीन सुलतानाचे हजारो फर्मान आहे. परंतु त्यातील एकाचेही हस्ताक्षर मिळालेले नाही मग ते सर्व काय निरक्षर होते का ? शिवाय निजामशहा आणि मलिक अंबर यांचीही पुष्कळ पत्रे उपलब्ध आहेत, परंतु त्यांचे हस्ताक्षर मिळालेले नाही. इतिहासकार अशी हरामखोरी करतील याची कदाचित शंका असल्यामुळेच महाराज त्यांच्या पत्रावर शेवटी स्वहस्ते बहुत काय लिहिणे, सुज्ञ असा, विनंती, हा आशिर्वाद ही अक्षरे स्वहस्ते लिहित होते.
याबाबत वि. का. राजवाडे काय म्हणतात ते पहा. अगत्याच्या दस्तऐवजावर मराठे घोराले छत्रपती बहुत काय लिहिणे सुज्ञ असा अशी अक्षरे स्वहस्ताने लिहुन लेखन समाप्ती करत असत. वरील सर्व मायना व मजकूर स्वामीच्या (छत्रपतींच्या) सुखवचनाप्रमाणे कारकुनाने किंवा मुत्सद्याने लिहावा व शेवटी विशेष अगत्य असल्यास बहुत काय लिहिणे सुज्ञ असा अशी समाप्तीची अक्षरे छत्रपतींनी स्वहस्ताने लिहावी असा परीपाठ असे. सारांश, बहुत काय लिहिणे या वाक्याने समाप्ती झालेली. छत्रपतींची सर्व पत्रे व आज्ञापत्रे स्वामीच्या मुखवचनाप्रमाणे अक्षरशः कारकुनांनी लिहिले असून हे वाक्य स्वामीच्या खुद्द स्व दस्तुर असे. (तत्रैव पृष्ठ ८)

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!