१७. कोणते लोक सोबत घ्यावे ?

१७. कोणते लोक सोबत घ्यावे ?

लोकांनी तुमच्यासोबत काम का करावे?

        लोकं काम का करतात?

शिवबाराजे आपणाला जे स्वराज्य निर्माण करावयाचे आहे त्यासाठी तुम्ही किंवा मी असे एकट्याने काम करून ते होणार नाही. यासाठी आपणाला एक समुह म्हणून, समाज म्हणून एकत्रितपणे काम करावे लागेल. तेव्हा आज मी तुम्हाला लोक का काम करतात ते सांगणार आहे आणि मग या लोकांनी काम करावे म्हणून तुम्ही काय काय करावे हे देखील सांगणार आहे. लोक उगाचच कोणाच्या तरी सोबत काम करीत नाहीत. आणि नुसतं असच काम करणारे लोक काही मोठं नवनिर्माणाचं काम करू शकत नाहीत. तेव्हा सर्वसाधारणपणे लोक आपआपल्या गरजेप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे किंवा अपरिहार्य कारणांमुळे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे काम करत असतात. आपणाला स्वराज्य तर शून्यातून उभे करायचे आहे तेव्हा आपणाला माणसे तर जोडावीच लागतील पण त्याचबरोबर ती दीर्घकाळही टिकवून ठेवावी लागतील. शेवटी मनुष्य हीच जगातील एक अमूल्य अशी संपत्ती आहे. तेव्हा ती संपत्ती प्राप्त करा आणि कायम श्रीमंत राहावे यासाठी समाजातील होतकरू माणसे शोधा, पारखा आणि जोडा.

आता सर्वसाधारणपे लोक इतरांसाठी किंवा दुसऱ्या कोणासाठी का काम करतात ते नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला आपली रयत, आपले सैन्य आपले अधिकारी यांची नीट निवड करता येईल, पारख करता येईल आणि स्वराज्य मोठ्या वेगाने वाढवता येईल. लोक दुसऱ्यासाठी का काम करतात त्याची प्रमुख पाच कारणे असतात ती खालीलप्रमाणे –

१) घाबरून Fear

२) पैसा – money

३) ज्ञान – knowledge

४) नेत्याकडे बघून Followers

५) विश्वास किंवा श्रद्धा – belief, faith

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!