१. व्यवस्थापनह्रम्हणजे काय?
१. जे आजपर्यंत उपयोगात आणले गेले नाही ते उपयोगात आणणे.
२. जे लोक आजपर्यंत कामाचे नव्हते त्यांना कामाला आणायचे,
३. ज्या गोष्टी वापरात आलेल्या नाहीत त्या वापरात आणणे,
४. जी साधने कमी उपयोगात आणली गेली तीच आणखी जास्त प्रमाणात उपयोगात आणणे. शिवाजी महाराजांनी हे व्यवस्थापन कसे शक्य केले ते थोडक्यात पाहू.
५. जी साधने उपयोगात आहेत ती अनेक पर्यायी कार्यासाठी उपयोगात आणणे.
१. जो सह्याद्री पर्वत आणि सह्याद्रीच्या रांगा कधीही कोणाही राजाने उपयोगात आणल्या नव्हत्या त्याच शिवाजी महाराजांनी उपयोगात आणल्या. इतरांनी ज्या भूमीला पडीक समजले आणि ज्या प्रदेशाला जंगलाचा आणि डोंगराचा म्हणून कमी लेखलं, सतत त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं तेव डोंगर तेच कडे आणि त्याच जंगलांचा उपयोग करून महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, वाढवलं आणि याच मुलभूत गोष्टीमुळे पुढे स्वराज्य लाखोंचा सेनासागर चालून आलेला असतानाही कायम राहीलं. तेव्हा आपणही आयुष्यात असेच जे उपयोगात आणले गेले नसेल ते उपयोगात आणायला शिकले पाहिजे.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
