२०. १००० पटीने विकास करा
२) दिवसाची सुरुवात करताना राजे तुमची महत्त्वाची ध्येये लिहून काढा.
शिवबा एक हजार पटीने प्रगती करायची तर ही दुसरी महत्त्वाची पायरी आहे. यात आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात करताना आज आपण कोणकोणती कामे करायची आजची आपली काय ध्येये आहेत ते लिहून काढायचे आणि आपण दिवसभरात कुठपर्यंत आलो, ठरवलेल्या कामातील किती कामे, किती ध्येये पूर्ण झाली याचे परिक्षण करायचे.
म्हणजे यात दोन गोष्टींचा समावेश आहे. daily plarining and daily assessment दररोजची ध्येय ठरवायचे आणि ती त्याचदिवशी पडताळणी करून पहायची. दिवसाच्या सुरुवातीला जे ठरवलं त्यातील किती काम पूर्ण झाले याचा अहवाल तयार करा परिक्षण करा. जेणेकरून किती काम बाकी राहिले आणि ते काम का बाकी राहिले याची आपणाला कारणमीमांसा चिकित्सा करता येईल आणि जिथे आपण कमी पडतो चुकतो ती गोष्ट ताबडतोब आपण दुरुस्त करता येईल.
असे केल्याने काय होईल? तर आज आपण केलेली चूक आजच आपल्या लक्षात येईल आणि ती आपणाला आजच दुरुस्त करता देखील येईल. जेणेकरून आपले फार काही नुकसान होणार नाही आणि आपला प्रगतीचा वेग कायम राहील. म्हणून दिवसाच्या सुरूवातीलाच महत्त्वाची अशी
५ ते १० ध्येये लिहून काढा आणि एक-एक करीत सगळीच्यासगळी पूर्ण करीत चला. आजचे काम आजच पूर्ण करणे, शून्य खोळंबा zero pendaney ची सवय लावणे.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
