५. संभ्रमित नव्हे तर समर्पित माणसे तयार करा.
तुम्हाला स्वराज्यासाठी जी माणसं उभी करायची आहेत ती अशी समर्पित अशी असली पाहिजेत. आता तुम्हाला संभ्रमित शिष्याचे उदाहरण मी महाभारतातून सांगते. महाभारताच्या युद्धात एक शिष्य असेच बुद्धीमान, पराक्रमी होते पण ते ऐनवेळी संभ्रमित झाले आणि मोठा बाका प्रसंग उभा राहिला. हा शिष्य ऐनवेळी मी युद्ध करणार नाही असे म्हणाला कारण काय तर माझ्यासमोर सगळे नातेवाईक आणि गुरुजनवर्गच दिसत आहे. तेव्हा अशा लोकांबरोबर युद्ध करून राज्य संपादन करण्यापेक्षा मी संन्यास घेऊन जंगलात गेलेलं बरं असं तो म्हणाला. गीतेचा पहिला पूर्ण अध्याय या अर्जुनरुपी संभ्रमित शिष्याचे प्रश्न आणि शंका आहेत. अर्जुनाचे जेव्हा प्रश्न संपले तेव्हा कुठे श्रीकृष्णाने एकेका प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात केली आणि अर्जुनाच्या ८४ प्रश्नांना उत्तर द्यायला श्रीकृष्णाला ५७५ उत्तरे द्यावी लागली. अर्थात एक प्रश्न बरोबर एक श्लोक आणि एक उत्तर बरोबर एक श्लोक गहल
म्हणजे एवढं मार्गदर्शन करून सर्व शंका निरसन करून सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यानंतर शेवटी मग अर्जुन म्हणाला, ‘करिष्ये वचनंम तव’ म्हणजे आता हे श्रीकृष्णा तु सांगशील तसेच करेन. शंका कुशंका घेणार नाही, प्रश्न विचारणार नाही आणि तुम्ही म्हणाल तसच करतो असं निश्चित झाल्यानंतर महाभारताचे युद्ध सुरू झाले. सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक, जगातील सर्व प्रश्नांचा तारणहार आपला गुरू असूनसुद्धा अर्जुनाने ८४ प्रश्न विचारले. असा शंकाखोर शिष्य असेल तर त्याची समजून काढत बसायची प्रत्येकवेळी मार्गदर्शन करीत
बसायचे हा उद्योग कोणी करत बसावा. कोणत्याही गुरूला हे शक्य नाही. आपले युद्ध आपण आपल्या बुद्धी, पराक्रम, शौर्याने जिंकायचे असते. आणि स्वतः गुरू सोबत असताना शंका प्रश्न निर्माण होणे हे काही योग्य नसते. जर शिष्य समर्पित असेल तर असे प्रश्न उभे राहत नाहीत. आणि असा शिष्य कोणत्याही गुरूच्या चांगल्या शिष्याच्या यादीत येत नाही. अर्जुनाच्या निमित्ताने जगातील प्रत्येक संभ्रमित माणसाला मार्गदर्शन मिळावे म्हणून गीता सांगितली गेली.
परंतु अर्जुनाने जेवढे प्रश्न आणि शंका विचारल्यामुळे जगाने कोठेही त्याचे एक मंदिर बांधले नाही. कारण असा शिष्य मिळावा अशी कोणीही अपेक्षा करणार नाही. पराक्रमी असे शिष्य तर दोघेही आहेत. हनुमान आणि अर्जुन. परंतु हनुमान श्रद्धावान आणि मालकाने दिलेली आज्ञा शंका-कुशंका न विचारता पालन करणारा आहे. तर अर्जुन हा पराक्रमी असून देखील शंकाखोर आहे. असे जर मालक प्रत्येक कामागाराला समजावत बसला तर त्या मालकाने आपले काम वाढवायचे तरी कसे? म्हणून अर्जुनासारखी माणसं कार्यपूर्तता करणाच्या बाबतीत वेळ लावतात अशा माणसांची लोकं मंदिरे कशाला बांधतील.
तेव्हा या गोष्टीचा अर्थबोध एवढाच की आपणाला स्वराज्य बांधणीसाठी जी माणसे हवीत ती हनुमानासारखी समर्पित अर्जुनासारखी पराक्रमी असून संक्रमित होणारी नव्हे. युद्ध प्रसंग पाहून तो स्वतःच्या बुद्धीचातुर्याने हाताळणारी माणसे हवीत. तेव्हा आपण अशीच माणसं शोधा, गोळा करा आणि त्यांना तशी कामे द्या.
हो आणि जी जी माणसे स्वराज्यासाठी असा पराक्रम गाजवतील या सर्व लोकांची आपण स्वतः शासकीय खर्चाने राजांच्या हस्ते मंदिरे अर्थात त्यांच्या वीरगळी स्मारके उभी केली पाहिजेत. ही माणसं ज्या ज्या ठिकाणी धारातीर्थी पडतील ती ती ठिकाणे स्वराज्याची प्रेरणा मंदिरे ठरतील म्हणून आपण इतर राजांपेक्षा हे वेगळे असे काम आवर्जुन एक जबाबदारी आणि
ज्या शंभूमहादेवाच्या साक्षीने महाराजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी स्वराज्याची शपथ घेतली त्याच शंभूमहादेवाच्या साक्षीने महाराजांनी स्वराज्यासाठी धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारके विरगळ बांधली. प्रत्येक प्रसंगात जो जो जिथे स्वराज्यासाठी आपला देह ठेवून गेला त्या त्या ठिकाणी ही स्मारके आपणाला आजही पहायला मिळतात.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
