६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales
५) सेल्समनला Rejection is a part of sale हा सर्वात महत्त्वाचा मंत्र
लक्षात ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी आणखीन एक नियम समजून आचरणात आणावा लागतो. तो नियम आहे १०:१. म्हणजे तुम्ही दहा लोकांकडे गेलात तर तुम्ही एका ग्राहकाला नक्की विक्री करू शकाल.
पण तो कोणता हे माहीत नसल्याने आपला संयम व चिकाटीने काम केले पाहिजे. कदाचित दहा मधील पहिले तीन तुम्हाला भेट पण देणार नाहीत. उरलेले सात लोक तुमचे म्हणणे ऐकून घेतील पण, त्यामधील तीन लोक म्हणतील मला इंटरेस्ट नाही. उरलेल्या चार पैकी तीन लोक म्हणतील तुमची वस्तू, सेवा चागली आहे. मला घ्यायची पण आहे. पण पैसेच नाहीत. उरलेला एक मात्र आपला नक्की ग्राहक बनेल.
क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडुलकरने १०० आंतरराष्ट्रीय शतके केली, त्यापैकी ४९ वनडे मध्ये. पण त्यासाठी त्याला ४६३ वनडे खेळावे लागले म्हणजेच दहा वन डे मागे एक शतक. कारण सचिनला Law of Average चा नियम माहीत होता म्हणूनच सेल्समनने हा १०:१ हा मंत्र लक्षात ठेवावा, सयमाने रिजेक्शन पचवीत चला आणि यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
