६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales

६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales

७) अमेरिका, चीन, जपान, जर्मनी हे देश विक्री अर्थात निर्यातीच्या जोरावरच आज जगातील मोठ्या अर्थव्यवस्था बनल्या आहेत. चीनचे उदाहरण तर डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासारखेच आहे. मी चीनला पंधरा दिवसाची भेट दिली, तेव्हा माझ्या लक्षात आले की चीनची अर्थव्यवस्था जगात दोन नंबरची का आहे. १४० कोटी लोकांपैकी ८० टक्के लोकांच्या नसानसात सेल्स आहे. विक्री कला, कौशल्य आणि विक्रीचे विज्ञान त्यांना कळते. त्यांच्या डीएनए मध्येच सेल्स आहे. म्हणूनच भारतासह जगातले दोनशे देश चीनवर निर्भर आहेत. आपल्या देशातील जे लोक सेल्समध्ये आहेत त्यापैकी ८० टक्के हे नोकरी मिळत नाही म्हणून बळजबरीने सेल्स मध्ये आहेत. म्हणून भारत देश निर्यातीपेक्षा आयात जास्त करतो. हेच आपल्या गरिबीचे व बेकारीचे प्रमुख कारण आहे. जेव्हा भारतातील लोक विक्री करणाऱ्या माणसांना इज्जत, मानसन्मान देतील. तसेच घराघरात विक्रीची कला आणि विज्ञान समजून कार्य करतील तेव्हा आपल्या देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यास वेळ लागणार नाही. कोणत्याही अर्थव्यवस्थेला वर न्यायचे असेल तर, विक्री व्यवसाय वाढवावा लागेल. विक्री केली तरच प्रॉडक्शन म्हणजे उत्पादन वाढेल. उत्पादन वाढल्यास नोकऱ्या मिळतील आणि आपली बेकारी, बेरोजगारी कमी होईल. या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी आपण विक्री कला आणि विक्रीचे विज्ञान समजून घ्या. आणि विक्री कलेत माहीर होऊन जीवनात यशस्वी व्हा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!