६५.मारवाडी, गुजराती इतके श्रीमंत कसे ?
६) पावर ऑफ कंपाउंडिंगची ताकद जाणतात:
जगातले सर्वात श्रीमंत आणि एक नंबरचे गुंतवणूकदार वारेन बफे म्हणतात. पावर ऑफ कंपाउंडिंग हे जगातले आठवे आश्चर्य आहे. हा नियम मारवाडी – गुजराती यांच्या नसानसांत असतो. जुन्या काळी हेच लोक व्याजाचा धंदा करीत असत. आणि व्याजावर व्याज कमवून अति श्रीमंत झाले. परंतु आता बँका आल्याने हा धंदा कमी झाला आहे, म्हणून ते आता शेअर मार्केटमध्ये उत्तरलेले आहेत. सध्या शेअर मार्केट मधील सर्वात मोठे इन्व्हेस्टर आणि ब्रोकर तेच आहेत. मी स्टेट बँकेत असताना शेअर्स वरील लाखो-करोडो रुपयांचे टॅक्स फ्री डिव्हीडंड इन्कम घेताना मी अनेकांना पाहिले आहे. ते अभ्यास करूनच चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन २० ते ४० टक्के उत्पन्न घेताना दिसत आहेत. म्हणून ते श्रीमंत आहेत. मारवाडी – गुजराती लोक रिस्क घ्यायला घाबरत नाहीत. ते म्हणतात No Risk No Gain. याचा अर्थ रिस्क घेतल्यावर ते फेल होत नाहीत असे नाही. ते फेल झाले तरी त्यांच्याकडे दुसरा बॅकअप प्लॅन तयार असतो. त्यांना १००० गुणिले १००० हा बिजनेस फॉर्म्युला माहीत असतो. धंद्यामधील गल्ल्यावरचा शेठ होण्यासाठी आगोदर धंदा सेट करावा लागतो. आणि कोणताही धंदा सेट व्हायला तीन वर्षे लागतातच. या तीन वर्षात धंदा सेट झाला नाही तर ते दुसरा धंदा सुरू करतात व श्रीमंत होतात.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
