७९.श्रद्धा व विश्वास ठेवा
स्वत्तःवर विश्वास व कामावर श्रद्धा ठेवली तर यश निश्चित मिळते. शके बाराशते बारोत्तरे। तै टीका केली ज्ञानेश्वरे । सच्चिदानंद बाबा आदरे। लेखकू जाहला. श्री ज्ञानेश्वरीबद्दल संत श्री एकनाथ महाराज म्हणतात, भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी। कृपा करी हरि त्यावरी. भाव म्हणजे श्रद्धा, भाव म्हणजे विश्वास. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमची पाठ्यपुस्तकेच तुमची ज्ञानेश्वरी. तुम्ही उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार, शेतकरी असाल तर तुमचे कार्य व व्यावसायिक मॅन्युअल हीच तुमची ज्ञानेश्वरी आहे. त्यावर श्रद्धा व विश्वास ठेवून कार्य केल्यास निश्चितच यश मिळते. याच मार्गाने मला प्रचंड यश मिळाले. तुम्हालाही मिळेल व तुम्ही यशस्वी व्हाल.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
