व्यवस्थापनाची चौदा रत्ने – ५. Unity of Direction: एकच दिशा

५. Unity of Direction: एकच दिशा

म्हणजे काय तर one head and one plan एका डोक्यात एकच योजना. एका डोक्यात दोन योजना तर मग समजून जा तेलही गेलं आणि तूपही गेलं. हाती धुपाटणचं आलं. ज्या-ज्या गोष्टीच्या योजनांचं एकच उद्दिष्ट आहे त्या सर्व योजना एक हाती असल्या पाहिजेत. समजा एका कंपनीत १०० सेल्समेन आहेत. जे एकच वस्तू, एकाच विभागात विकतात आणि त्यांच्यावर दोनच निरीक्षक आहेत. म्हणजे प्रत्येक सुपरवायझरकडे ५० सेल्समनची जबाबदारी आहे आणि त्या प्रत्येक ५० सेल्समनला जो आदेश दिशा दिली जाईल तो त्या निश्चित अशा निरिक्षकाकडूनच पहिले ५० लोक A च्या हाताखाली असतील तर त्यांना दिशा A नेच द्यायची. दुसरी ५० लोकांची जी तुकडी आहे ती B कडे आहे. तिला दिशा देण्याचे काम B चे आहे. A आणि B अधिक १०० सेल्समन या सगळ्याची दिशा एकच आहे. जी योजेनत सांगितली गेलेली आहे. म्हणजे सर्व लोकांनी Plan मध्ये ठरलेल्या दिशेने एकाच वेळी प्रवास केला तर object किंवा target लक्ष्य पूर्ण होईल.

उदा. महाराजांनी लाल महालावर छापा घालताना फौजेच्या दोन तुकड्या केल्या होत्या. १००० मावळे महाराजासोबत आणि १००० मावळे नेताजी पालकांसोबत, पुढे गेल्यावर या हजार मावळ्यांच्याही दोन-दोन तुकड्या पडल्या. आता इथे प्रत्येक तुकडीने आपापल्या वरीष्ठाचा आदेश पाळत पुढे सरकल्या. सगळ्या तुकड्या वेगवेगळ्या मार्गानी आपल्या ठरलेल्या योजनेप्रमाणे पोहचल्या आणि महाराजांचा छापा यशस्वी झाला. महाराज १२५००० फौजेच्या गराड्यात घुसून खानाचा हात छाटून सुरक्षित सिंहगडावर पोहचले देखील.

कोंढाणा घेताना सुद्धा ६०० मावळ्यांच्या दोन तुकड्या पाडल्या गेल्या होत्या. ३०० मावळे तानाजी सोबत आघाडीवर खंदकड्याच्या बाजूने वर गेले तर दुसरे ३०० मावळे कल्याण दरवाज्याकडून सूर्याजीच्या नेतृत्वात वर चढून आले. दोघांनीही एकाच दिशेने ठरलेल्या प्लॅन नुसार प्रवास केला. त्यांच्या हाताखालील ३००-३०० मावळ्यांनी unity of Direction आदेशाची दिशा पाळली आणि म्हणून सिंहगड किल्ला स्वराज्यात आला. साल्हेरच्या लढाईतही ८०,००० मोगलांचा ४०,००० मराठ्यांनी असाच प्रतापराव आणि हंबीररावांच्या नेतृत्वात उघड्या मैदानात भर दिवसा दारुण पराभव करत स्वराज्यात unity of direction हे सूत्र किती मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे वापरले जाते हे दाखवून देण्यास पुरेसे आहे.मराठ्यांचा गनिमी कावा हे युद्धतंत्र unity of direction चेच वेगळे नाव आहे. कारण या पद्धतीत आघाडी, पिछाडी, डावी बाजू, उजवी बाजू अशा चारही बाजूंनी फौजा एकाच दिशेने आगेकूच करत ठरलेली योजना अंमलबजावणी करत फार प्रचंड मोठ्या शत्रूचा मूठभर फौजेच्या मदतीने दारुण पराभव करत असत. एकदा नव्हे. दोनदा नव्हे तर हमेशा, नेहमी. विषय जास्त लांबवायचा नाही म्हणून थोडक्यात सांगितले. जगाने पहावे शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य तोंडात बोट घालून. कायम आश्चर्यचकीत करणारी कामे महाराजांनी कशी केली ती म्हणजे कळेल महाराज कसे व्यवस्थापनाचे गुरु आहेत. स्वराज्याचा प्रवास एकाच दिशेने झाला आणि ते सातत्याने विस्तार पावत राहिले. आठ शत्रूचा सामना करुन २२ देशांना अंगावर घेऊन शेकडो आंतरराष्ट्रीय सेनापतींना पाणी पाजून.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!