जाहिरात म्हणजे बुलंद सेतू !

जाहिरात म्हणजे बुलंद सेतू !

मार्केटींग तज्ज्ञ स्टुअर्ट ब्रीट असे म्हणतात की, “जाहिरातीशिवाय व्यवसाय करणं म्हणजे अंधारातून मुलीला डोळा मारण्यासारखे आहे. आपल्याला कळतं की आपण काय करतोय, पण इतर कोणालाही ते कळत नाही.” यातला विनोदाचा भाग जर आपण सोडला आणि तात्पर्य जर आपण समजून घेतले तर व्यवसाय करताना जाहिरात किती महत्त्वाची आहे हे आपल्या लक्षात येईल. आजच्या आधुनिक युगात आपलं उत्पादन, आपली सेवा खूप उत्कृष्ट आहे, एवढंच असून चालत नाही. तर ते किती उत्तम आहे ही माहिती आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे देखील खूप महत्त्वाचे आहे.
सर्व नामांकित बॅण्डसनी जाहिरातीची शक्ती ओळखली आहे. फेविकॉल, कोका- कोला, पतंजली, अमुल, सुहाना मसाला असो किंवा पु.ना. गाडगीळ, कॉटन किंग, स्टेट बँक ऑफ इंडिया, वीणा वर्ल्ड असो. ग्लोबल ते लोकल अशा हजारो बॅण्डस्नी जाहिरातींची सुरेख साथ घेत नवनवे विक्रम रचले आहेत.
जाहिरात ही उद्योगधंद्याच्या वाढीसाठी उपयोगी ठरत असते. जाहिरातीसाठी खर्च होणाऱ्या रकमेला ‘खर्च’ म्हणून न पाहता एक प्रकारची गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे. अजून एक गोष्ट खास सांगावीशी वाटते की, जाहिराती देखील दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे चांगली व विचारपूर्वक केलेली जाहिरात तुमच्या उत्पादनाची विक्री वाढवत असते तर दुसरी वाईट जाहिरात विक्री वाढविण्याऐवजी आपल्या ग्राहकांना आपल्यापासून दूर करत असते. कंपनीचीइमेज (ज्याला बॅण्ड-इमेज असे देखीलम्हणतात) खराब करू शकते

जाहिरात करताना खूप काळजी घेतली गेली पाहिजे. आपली जाहिरात, वाचताना किंवा पाहताना ग्राहकांचा वेळ वाया जाता कामा नये. उलट त्यांना जाहिरात त्यांच्या उपयोगाची वाटली पाहिजे. त्यात त्यांना त्यांचा फायदा दिसला पाहिजे. असं काहीतरी त्या जाहिरातीमध्ये हवं की ती जाहिरात लक्षवेधी तर झालीच पाहिजे परतू त्याचवेळी विक्रीवृध्दीला देखील खरी उतरली पाहिजे. जाहिरात बनवण्यासाठी तज्ज्ञांची अवश्य मदत घ्या. त्यांचा अभ्यास, त्यांची रणनिती आणि त्यांचा सल्ला तुमच्या कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो.
केवळ सुंदर दिसणं म्हणजे जाहिरात नाही. तुमच्या उत्पादनांची विक्री वाढविण्याचं सामर्थ्य आणि क्षमता त्या जाहिरातीमध्ये असायला हवी. जाहिरात तयार करणं खूप कौशल्याचं काम आहे. त्यामागे खूप अभ्यास असतो. संशोधन असतं. जाहिरात हे अतिशय वेगळं क्षेत्र आहे. तुम्हाला तुमच्या कंपनीच्या उत्पादनांची उत्तम विक्री करायची असेल तर जाहिरातीची नक्कीच मदत घ्याः ओपलं उत्पादन काय आहे याही पेक्षा महत्त्वाचं आहे की आपल्या उत्पादनाची खासीयत आणि वेगळेपणा अतिशय कल्पकतेनं ग्राहकांच्या मनावर बिंबवणं. त्याचं विशेष स्थान निर्माण करणं आणि ग्राहकांचा आपल्याबद्दल विश्वास निर्माण करणं. उत्कृष्ट जाहिरात म्हणजे तुमचं उत्पादन आणि तुमचा ग्राहक यांना जोडणारा बुलंद सेतू आहे.

 

ज्ञानेश शिंदे
क्रिएटिव्ह आर्टिस्ट अॅण्ड अॅण्ड कन्सल्टंट
मो. ९८२२२ ४९५७७
Email: [email protected]

error: Content is protected !!