व्यवस्थापनाची चौदा रत्ने – ७ . Remuneration: कामाचा मोबदला

७ . Remuneration: कामाचा मोबदला

सहकारी किंवा कर्मचारी यांना योग्य तो मोबदला दिला गेला पाहिजे. व्यवस्थापन शास्त्रातील हे अत्यंत महत्वाचे तत्व किंवा सूत्र आहे. सहकारी किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला दिला गेलाच पाहिजे आणि त्याहून महत्वाचे म्हणजे तो मोबदला वेळेवर मिळाला पाहिजे. आपण या मोबदल्याला पगार किंवा वेतन म्हणतो.

आता महत्वाचा प्रश्न पडतो कामाचा मोबदला किती द्यावा तर कोणाचा मोबदला किती असावा हे ज्याच्या त्याच्या कामावरुन ठरविले जाते. शिवाय राहणीमान, खर्च, महागाई इत्यादी गोष्टीही लक्षात घेतल्या जातात आणि बऱ्याचदा फक्त रोख पैशात पगार घेऊन भागत नाही. चांगल्या संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतीरिक्त जे फायदे देतात त्यामध्ये चांगले वातावरण ल्यात कामगार सहजपणे उत्साहाने काम करु शकेल, कॅन्टीनची सोय जेथे कर्मचारी व्यवस्थीत जेवण करु शकेल, मधल्या सुट्टीत किंवा इतर वेळी मनोरंजन करु शकेल अशा सुविधा पुरवतात.

छत्रपती शिवाजी महाराजांची योग्य मोबदला देण्याची पद्धत अत्यंत उत्कृष्ट अशी होती. ज्याच्याकडे घोडा आहे तो घोड्यासह स्वराज्याच्या नोकरीस आला असेल तर त्याच्या घोड्याच्या खुराकाचाही सरकारमधून खर्च दिला जाई. सैनिकांना पगार वेळेवर दिला जाई. यात कधीच दिरंगाई झालेली पहायला मिळत नाही. ज्यांच्याकडे स्वतःचे घोडे नाहीत त्यांना सरकारातून घोडा दिला जाई आणि घोड्यांची काळजी पाहण्यासाठी मोतदार ठेवला जाई. महाराज आपल्या सहकाऱ्यांना जो पगार देत त्याचे दोन भागात विभाजन करता येते. एक म्हणजे अधिकारी वर्गाला दिले जाणारे वेतन यात अष्टप्रधान मंडळ, सेनापती, हवालदार, जुमलेदार, हजारी, पंचहजारी, सप्तहजारी अशा लोकांचा समावेश होतो. या लोकांना जे वेतन दिले जाई ते आज व्यवस्थापकाला जसे वार्षिक दिले जाते तसे Annual base वर दिले जाई. शिवाय लेखन साहित्य खर्च, कागद, शाई, पेन यांचा खर्च या अधिकाऱ्यांच्या हाताखालील मदतनीस, फडणीस, पोतणीस, यांचा पगारही वेगळा केला जाई. शिवाय पालखी (लाल बत्ती) च्या भोईंचा पगार वेगळा दिला जाई.

तर सैनिकांचा पगार हा रोजमुरा म्हणजे डेली बेसीस वर दिला जाई. महाराज आपल्या मंत्र्यांना किंवा सैनिकांना जो पगार देत त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे

पेशवा १५,००० होन वार्षिक, अमात्य १२००० होन वार्षिक, सचिव, सुमंत, सेनापती, पंडीतराव, न्यायाधीश, मंत्री, प्रत्येकी १०,००० होन वार्षिक. जुमलेदार ५०० होन वार्षिक, मुजुमदार, कारभारी जमेनीस प्रत्येकी ५०० होन वार्षिक. पायदळ जुमलेदार१०० होन वार्षीक, सबनीस ४० होन, हजारी ५०० होन आणि त्याचा सबनीस १०० ते १२५ होन.

आज आत्ताशी कुठे २१ व्या शतकात व्यवस्थापकाला रहायला घर, प्रवासाला गाडी आणि इतर फायदे देण्याचा कंपनी विचार करत असताना २६० वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना अगदी शाईपासून, कागदापासून खर्च करायला वेगळे पैसे देणे हे किती दूरदर्शी पाऊल होते ते आपणाला कळून येईल. म्हणूनच महाराजांना आपण भारतीय व्यवस्थाप शास्राचे जनकच म्हणणे योग्य होईल. Because of his vision in management he should be rightly called as Father of modern Indian welfare management.

अगदी संभाजी राजांना वयाच्या सोळाव्या वर्षी प्रशासनात उतरवताना २६ जाने १६७१ ला महाराजांनी शंभू राजांना खाजगीतुन मदतनीस म्हणजे सहाय्यक नेमून दिला. महादजी यमाजी हा शंभू राजांचा P.A. याचा पगारही वार्षिक आणि त्याला शाई, कागद यांचा वेगळा खर्च पगाराव्यतिरिक्त मंजूर केल्याचे रेकॉर्ड आहे.

स्वराज्यासाठी लढताना अपंग झालेल्यांना औषधोपचार खर्च वेगळा दिला जाई. तसेच जे मावळे शहीद होत त्यांच्या घरी त्या सैनिकांच्या वेतनाच्या अर्धी रक्कम जोपर्यंत त्या घरातील कोणी कर्ता मनुष्य कमावता होत नाही तोपर्यंत चालू राही. आणि शहीद झालेल्या मावळ्याच्या मुलांना आणि त्याची योग्यता आणि आवड पाहून लष्करी किंवा मुलकी कारभात सामावून घेतले जाई. Child is absorbed in Military service or if not administrative service.

आणि समजा मावळा शहीद झाला तेव्हा जर ही मुले शाळेत जात असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च महाराज स्वतः करीत असत. याला म्हणतात दूरदर्शी व्यवस्थापक महाराज म्हणूनच राजे नव्हे व्यवस्थापकाचे व्यवस्थापक आहेत.

सैनिकांचा पगार देण्याच्या बाबत शिवाजी महाराज किती दक्ष असत आणि नियमितपणे ते वेतन कर्मचाऱ्याला मिळालेच पाहिजे यासाठी महाराजांनी जी व्यवस्था राबविली त्याचा इतिहासातील हा पुरावा.

“Shivaji gave them on this account a good salary and with such punctuality that on the appearance of the new moon (प्रतिपदा) Each one received what had been promised at the time of enlistment” – FOREIGN BIOGRAPHY OF SHIVAJI by Surendra Sen

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!