नियोजन करण्याचे टप्पे

7.Formation of Derivative plans पूरक Plan बनवा

 

आपले ध्येय गाठण्यासाठी बनविलेल्या मुख्य योजनेला गती देणारे छोटे पर्ने तयार करा. म्हणजेच काय तर operating plans are required to implemen the overall plan. है operating plans short range + sub plans यांचे मिश्रण होय. सगळ्या हालचाली व्यवस्थीत पार पाडण्यासाठी यांची आवश्यकता असते. इमारत बांधणे हे ध्येय असेल तर त्यात पिलर आणि विटा यांना जागा असलीच पाहिजे ना. तर हे मग त्यात आपलं बजेट काय. वेळ किती हाताशी आहे. नियम काय आहेत हे सग आलंच की. आता याच ज्वलंत उदाहरण पहा. महाराजांनी पन्हाळ्यातून बाहेर पडून विशाळगड गाठायचा हे झालं ध्येय. कोणत्या मार्गाने जायचं हे ठरविलं हे झालं नियोजन आणि यातील Derivative Plan म्हणजे पुरक नियोजन काय काय केलं ते पहा किल्ल्याच्या गस्ती पहाऱ्यातून नजर चुकवून बाहेर कसं पडायचं जर पाठलाग झाला तर कोणता मार्ग धरायचा.

पाठलाग योग्य दिशेने झाला तर मग शत्रूला रोखण्याचा मार्ग काय पहिला टप्पा शिवा काशीदने महाराज बनून वेळ वाया घालवून शत्रूची दिशाभूल करायची. त्यानंतर दुसऱ्या टप्यात जर शत्रूने पाठलाग करण्यात यश मिळविले तर खिंडीच्या पुढे एकच मार्ग विशाळगडाकडे जातो तेव्हा शत्रू खिंडीतच अडवला गेला पाहिजे. मग ती खिंड किती लोकांनी किती वेळ रोखून धरायची. इकडे हा प्लॅन वर्कआउट होत असताना तिकडे महाराजांनी कसा विशाळगड गाठायचा. किती वेळ लागेल आणि तिथे गेल्यावर आणखी काही अडचण आली तर ती कशी सोडवायची याचा सगळा अभ्यास करुन तशी तयारी करुनच महाराज बाहेर पडले. महाराजांच नियोजन अचूक असल्यामुळेच ते नबोवू शकले अन्यथा नाही. महाराज एवढी मोठ-मोठी जीवघेणी संकटे पार पुरायलो चाबूक नियोजन करायला आम्हाला शिकवून गेले तरी आज आम्ही दोन वेळच्या भाकरीचं अधीजन करण्यासाठीच पदवी पर्यंत कामी न येणारं शिक्षण घेण्यात घालवतो. कारण आमच्या आयुष्याचं नियोजनचं नाही.

कमी वयात मोठी ध्येय बाळगणारे महाराज कुठे आणि आम्ही मोठ्या वयात छोटी किरकोळ ध्येय स्वप्नात उराशी बाळगणारे कपाळ करंटे कुठे! आपण महाराजांना ओळखलं नाही म्हणून ही महाराष्ट्राची दशा आणि आपली ही दुर्दशा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!