2.विचार करा आणि श्रीमंत व्हा :Think and Grow Rich

विचार करा आणि श्रीमंत व्हा :Think and Grow Rich

 

पैसा कमवून तो स्वतः बरोबर समाजासाठी वापरला तर ती व्यक्ती श्रीमत चाऊन आनंदी होते व तिलाच मानसन्मान, प्रतिष्ठा आणि समाधान मिळते. जा पैसेच नसतील तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून म्हणतात पैसाच सर्व काही नाही, पण पैसाच सर्व काही आहे. सगळी नाटके करता येतात पण पैशाचे नाटक करता येत नाही.

अमेरिकेमध्ये सर्वात जास्त बिलिनियर, अरबपती, वैज्ञानिक, उद्योजक आणि लेखक आहेत. कारण ते ज्ञानाला महत्त्व देतात. या पुस्तकाचे लेखक पत्रकार होते. त्यांनी नेहमी समाजाला नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे. नेपोलियन हिल १३ वर्षांचे असताना, १९१७ साली त्या काळातील सर्वात श्रीमंत उद्योजक डेल कार्नेगी यांची मुलाखत घ्यायला गेले. डेल कार्नेगी खूप प्रभावित झाले. त्यांनी स्वतःची मुलाखत तर दिलीच पण त्याबरोबर स्वतः सारख्याच श्रीमंत आणि यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती घेऊन पुस्तक लिहायला सांगितलं लेखकाने पुढील २० वर्षांत, श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यामध्ये फोर्ड कंपनीचे जनक हेनरी फोर्ड, महान शास्त्रज्ञ अलेक्झांड ग्राहम बेल, अल्बर्ट आईन्स्टाईन अशा पाचशे लोकांच्या मुलाखती घेतल्या त्यावर रिसर्च करून १९३७ साली ‘विचार करा आणि श्रीमंत व्हा’ Think and Grow Rich नावाचे पुस्तक लिहिले. त्याच्या लाखो प्रती विकून लेखक स्वतः अरबपती झाले. हे पुस्तक हा यशाचा कायदा झालेला आहे आणि कायदा सर्वांनाच सारखा असतो. तुम्हाला एखादी लॉटरी लागली म्हणजे दुसऱ्याला लागेलच असं नाही.

नेपोलियन हिलने विचाराने श्रीमंत होण्याचे काही मार्ग सांगितले आहेत ते म्हणजे बर्निंग डिझायर म्हणजे ज्वलंत इच्छाशक्ती, Believe म्हणजे विश्वास, ऑटो सजेशन म्हणजे स्वयंसूचना, स्पेशलाइज नॉलेज म्हणजे विशेष ज्ञान दमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती, मास्टर माइंड, सुसंबद्ध योजना, निर्णय क्षमता, मेदची ताकद, सुप्तमन, भीती आणि सिक्स सेन्स.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!