४. Choosing of an alternative पर्यायाची निवड करा
आता नको असलेले पर्याय तुम्ही वगळलेले आहेत. राहिलेल्या पर्यायांपैकी योग्य तेवढा पर्याय निवडणे काम बाकी आहे ते करुन घ्या. जो पर्याय कमीत कमी खर्चाचा आणि जास्तीत जास्त फायद्याचा आहे तो निवडा. एक चांगल्या प्रकारची कल्पनाशक्ती आणि तल्लख बुद्धीमतेची यासाठी गरज आहे. जी आपण अनुभवातून आणि नवनवीन गोष्टी शिकून आत्मसात केली पाहिजे. असं म्हणतात की अनुभव असल्यावर निर्णय चुकत नाही आणि चुकीचे निर्णय घेतल्याशिवाय अनुभवही येत नाही. तेव्हा एखादे वेळी चूक करायला हरकत नाही पण एकच चुक पुन्हा केली तर मग मात्र परवडणार नाही. मरणाचा अनुभव दुसऱ्यांदा घेण्याची गरज नाही. तसं दुसऱ्यांदा तीच चूक होणार नाही याची दक्षता घ्या. महाराज पुन्हा उभ्या आयुष्यात आग्र्याला गेले नाहीत. औरंगजेबावर विश्वास ठेवला नाही.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
