आदर्श विद्यार्थी बना

आदर्श विद्यार्थी बना

 

प्रत्त्येक यशस्वी व्यक्ती ही जन्मभर स्वतःला विद्यार्थी समजूनच ज्ञान ग्रहण करीत असते. त्या ज्ञानातून स्वतःला अपग्रेड अर्थात अद्ययावत करीत असते. म्हणूनच ती यशस्वी असते. विद्यार्थी शब्दाचा अर्थ असा आहे. वि-म्हणजे विनम्र, विश्वासू, विवेकसंपत्र, द-म्हणजे दमदार, दणकट, या- म्हणजे यातना सहन करणारा, र म्हणजे रणांगणात उभा असलेला, थी – म्हणजे स्थिर असणारा, उतावळा नसणारा. विद्यार्थीदशेत स्वतःला थोडी सजा दिली, अभ्यास केला, सर्व प्रकारचे ज्ञान घेतले तर जन्मभर मजा माराल. अन विद्यार्थी दशेत मजा माराल तर जन्मभर सजा भोगावी लागेल. म्हणून आपण आदर्श विद्यार्थी बना. जीवनात यशस्वी व्हा.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://nagebabaudyojakmanch.org/4992-2/ ‎

error: Content is protected !!