जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

३. Initiative पुढाकार घेता आला पाहिजे

शिवाजी महाराजांच्या अंगी हा गुण किती उत्कृटतेने होता वसलेला होता पहा. अफजलखानाशी तह करावा असं एकजात सगळं मंत्रीमंडळ म्हणत असताना महाराजांनी तो सला करावा हा सल्ला धुडकावून लावत अफजलखानाची भेट घेऊन खानासह त्याच्या फौजेचा फडशा पाडला. शाहिस्तेखानावर छापा टाकायला सुद्धा सगळ्यांनी त्यातील धोक्याची यादी महाराजासमोर ठेवून कार्य अवघड आणि जीवावर बेतणारे ठरेल असे सांगितल्यावर तर महाराज स्वतः छापा घालायला पुढे आले आणि छापा टाकून मोहीम फत्ते करुन सहीसलामत परत आलेदेखील. महाराज आग्र्याला जाणार हे पाहून अनेक विद्वानांनी महाराजांना धोक्याचा इशारा दिला तरीही महाराज आग्र्याला गेले आणि आपल्या बुद्धीमतेच्या जोरावर तेथून एकटे नाहीतर सोबत गेलेल्या प्रत्येकाला सहीसलामत परत घेऊन आले. महाराजांची आग्र्यातून सुटका हे पलायन नसून बुद्धीच्या जोरावर अन्यायाने झालेल्या कैदेतून करुन घेतली महान सुटका आहे.

  The great escape from the treacherous enemies cave.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!