जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू
६. Communication skill : संवाद कौशल्य
राजेलोकी परिमित बोलत जावे. कार्यविरहित हरकोणाशी तरी भलत्याच गोष्टी बोलत बसू नये. असे बोलू लागल्यावर मनुष्य सलगे होऊन अमर्याद होते. राजकारणप्रसंगी, कार्याकार्यविचार, प्राप्तप्रसंगाचे गुणदोष, ज्या लोकांशी बोलणे ते, आधी त्या लोकांचे प्रोत्साहन प्रगल्भपणेच अगत्यागत्य करुन, त्यांजकडूनच बोलवावे. आपण चित्त देऊन ऐकावे.
आपले युक्तीस समर्पक आले तर उत्तम म्हणून मान्य करावें. विचारास त्या लोकांची नजर पावली नसली तर आपण त्यांची अवहेलना न करिता स्फुटवक्तेपणे साहित्य योजून, उतावळी न दर्शविता सावकाशे संपूर्ण कार्यविवंचना गुण ते बोलावे. त्या लोकांचे प्रत्ययास आणून द्यावे. वरकड नित्य कार्य साधारण सेवकांस सांगणे ते प्रायशः इशारतीनेंच सांगत जावें.
इशारत म्हणून सर्वकाळ नेत्र हस्तपादादि अंगविकार, शरीरचांचल्य सर्वथा न दाखवावे. बसले ठायी स्थाणु किंवा मेरु असा आसनजय बरा अभ्यासावा. राजेलोकी लहान अथवा थोर कोणी एक सेवकाचा दोष मुखे उच्चारीत जाऊ नये. आढळल्यास दुसऱ्याजवळ बोलू नये. आपल्याच चित्तात ठेवून त्याचे परिहाराचा उपाय योजीत जावा.
कोणतेही एक पडले अंतर धन्यास कळले नाही इतका पडदा आहे तोच बरें. इतक्याने माणूस मर्यादवंत किंबहुना प्रतिकाराविषयीही सावध राहते. त्यामुळे त्याचा प्रतिकार करावयास सुलभ पडते.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
