जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

८. Proper judgement : योग्य निर्णय

कोण कामासाठी मरतो आणि कोण श्रेयासाठी तडफडतो हे ओळखून प्रत्येकाच्या कामाची पोचपावती देणं याला म्हणतात योग्य निर्णय. अहो नेतृत्व करायचं म्हणजे अनुयायी आलेच ना. मग तुमच्या सोबत, मागे जे आहेत ते लढणारे आहेत की बाजारबुणगे आहेत ते ठरवा. किंवा ते फक्त बघे असतील तर तसेही बघा. नाहीतर तो असरानी जेलर असताना जी ऑर्डर देतो आधे उधर जाव, आधे इधर जाव बाकी मेरे साथ आव असं व्हायचं. असं स्वतःच हसू व्हायचं नसेल नामुष्कीची वेळ येऊ द्यायची नसेल तर खरे अनुयायी ढोंगी अनुयायी यांचा फरक करुन निर्णय घ्या. कोणाला सोबत घ्यायचं कोणाला सोडून द्यायचं आणि विशेष म्हणजे कोणाला खांद्यावर घ्यायचं आणि कोणाला तोंडावर आपटायचं ते ठरवणं म्हणजेच निर्णय घेणं. कोणाला डोक्यावर घेण्याचा मात्र निर्णय घेऊ नका.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!