जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

८. Proper judgement : योग्य निर्णय

कारण डोक्यावर घेतल्यावर अनुयायी खांद्यावर मुतायला कमी करत नसतात. म्हणून किती लाडका असला तरी डोक्यावर घ्यायची हिंमत करु नका. बळीराजाला पाताळात जावं लागलं. आपल्याला खड्यात जावं लागेल आणि तेथून बाहेर पडता येणार नाही. मग खड्यातच आपला शेवट बाकी काय! भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी असं अनुयायी करायला एका पायावर तयारच असतात म्हणुन त्यांची दुसरी टांग जरा दुसऱ्याच्या टांगेत अडकवून ठेवा. मोकळी ठेवताल तर तुम्हालाच टांग मारुन जातील आणि स्वतःचा टांगा पुढे पळवतील.

म्हणून कार्यकर्त्याच्या योग्यतेबाबत योग्य निर्णय देणाराच नेता सातत्याने मोठा होत जातो. ज्या दिवशी प्रामाणिक कार्यकर्त्याना योग्य न्याय दिला जात नाही त्या दिवशी आपला निर्णय चुकला याची जाण ठेवून तशी किंमत मोजायची तयारी ठेवा. आता जर एखादा नेता असे म्हणेल की माझा निर्णय कधीच चुकत नाही तर लेका तु कधी निणर्यच घेतला नसशील. मी कधीच चुकलो नाही असे म्हणणारा शक्यतो काहीच करत नाही. चुकण्याचा प्रश्न जर तुम्ही काही करायला निघालात तरच येतो. अरे पडतो कोण जो चालायचा प्रयत्न करतो. तुम्ही हुशार आहात तुम्हाला काय वाटतं पडतो कोण जो निवडणुकीला उभा राहतो. अहो आवश्यक नाही तुम्ही नेता होण्यासाठी निवडणुक लढविलीच पाहिजे.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!