३०.मालक समजून काम करा
दहा वर्षांपूर्वी माझ्या कंपनीत एक व्यक्ती नोकरी करीत होता. एकदा निवांत वेळी तो मला म्हणाला, यार मित्रा तू किती नशीबवान निघालास. तुला आठवतंय का, तीस वर्षांपूर्वी आपण दोघेही तीन हजार रुपये पगारावर स्टेट बँकेत नोकरी करत होतो. आज तू कंपनीचा मालक आहेस व मी नोकर आहे. त्यावर मी त्याला म्हणालो, मी नशीबवान आहे का नाही हे मला माहीत नाही. पण तुला आठवतंय का, एका संध्याकाळी आपण घरी जाताना, अर्ध्या रस्त्यात मला आठवलं की माझ्या केबिनमधील लाईट आणि फॅन बंद करायचे राहून गेले. त्यावर तू म्हणाला, बँकेला काय फरक पडतो? चल घरी. पण मी परत बँकेत गेलो. लाईट बंद करूनच घरी गेलो. मी त्यावेळी मालक समजून नोकरी केली, म्हणून मी कंपनीचा मालक झालो. तू त्यावेळीही नोकर म्हणून काम केलेस व आजही नोकर म्हणूनच काम करतोस. म्हणून आपण मालक समजून काम केल्यास एक दिवस तुम्ही निश्चित मालक बनाल, हा माझा स्वअनुभव आहे.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
