नेतृत्वाच्या जगमान्य पद्धती

९. Situational style

नेतृत्वाची हि पद्धत अत्यंत प्रोफेशनल अशी मानली जाते. नेतृत्व करण्याच्या वरील पद्धतीपैकी जशी परिस्थिती असेल जसा काळ असेल प्रसंग असेल आणि त्याला अनुसरुन जी पद्धत लागू पडेल ती वापरायची परंतु निकाल द्यायचा. एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत सदा सर्वकाळ एकच नेतृत्वाची पद्धत वापरता येणं शक्य नसतं. कधी नेत्याला ऑटोक्रॅटीक व्हावं लागतं तर कधी ब्युरोकॅटीक तर कधी कन्सलटेटीव्ह तर कधी पार्टीसीपेटीव्ह.

त्यामुळे प्रसंगावधान राखून नेतृत्व करण्याची पद्धत म्हणजेच ही पद्धत होय त्यामुळे ही पद्धत वापरणारा नेता खऱ्या अर्थाने परीपूर्ण चतुरस्र असा नेता म्हटला पाहीजे. वरील सर्व नेतृत्व करण्याच्या पद्धती ज्याला अवगत असून तो गरजेप्रमाणे यातील योग्य ती पद्धत वापरुन सदैव यशस्वी होत असतो. लक्षात ठेवा सुतार जेव्हा जंगलात घुसतो तेव्हा तो सरळ झाड अगोदर शोधतो आणि नेमके तेच कापतो. तसा हा नेता वेळ काळ आणि प्रसंग पाहून नेतृत्वाची अचूक शैली वापरुन आपल्या सहकाऱ्याकडून येन-केन प्रकारे पण काम करुनच घेतो आणि निकालसुद्धा लावतो. गरजेप्रमाणे हा नेता कधी प्रोफेशनल तर कधी भावनिक तर कधी हुकुमशहा असतो. काहीही असो तो यशस्वी होण्यासाठी हातपाय मारत असतो. आणि तो वेळेप्रमाणे कसाही पवित्रा घेऊ शकतो. यशस्वी नेता व्हायचं असेल तर नेतृत्वाची हिच पद्धत अंमलात आणा आलम दुनिया तुमच्या पायावरी.

नेतृत्व करण्याची एकच पद्धत सगळ्या प्रसंगी वेगळ्या काळी वापरता येत नाही म्हणून ही सर्वसमावेशक पद्धत जगभर स्विकारली गेली आहे. कामाचे स्वरुप, तुमच्या हाताखालील कर्मचारी, सहकारी अनुयायी आणि ज्या वातावरणात ते काम घडवून आणायचे आहे ते प्रसंगानुसार वेगवेगळे असणार आहेत. म्हणून या सर्व घटकांना मॅच होणारी नेतृत्व पद्धत विकसीत करावी लागते. म्हणजेच काय तर या नेत्याला आपली ताकद सहकाऱ्यांची ताकद माहीत असते. वातावरणाची त्याला जाण असते आणि प्रसंगाच अचूक विश्लेषण करण्याची क्षमता देखील असते. म्हणून तो सर्वकाळ यशस्वी होतो.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!