Motivation प्रेरणा म्हणजे काय ?
प्रेरणा म्हणजे काय ? असा प्रश्न पडणे म्हणजेच उत्तर जाणून घेण्याची प्रेरणा असणं होय. प्रेरणेला आपण इंग्रजीत motivation म्हणतो आणि हा motivation नावाचा शब्द motive या मूळ शब्दापासून बनला आहे आणि तो खूप मोठा अर्थ असलेला शब्द आहे. ज्यात अर्था (पैशा) सह अनेक अर्थपूर्ण घटक सहभागी आहेत. तर प्रेरणा म्हणजे काय तर अंतस्थ प्रेरणा, आपण काहीतरी करण्याची नैसर्गिक उर्मी.
मायकल ज्युसीआन याने याबाबत केलेली व्याख्या पाहा. “Motivation is the act of stimulating someone or oneself to get a desired course of action, to push the right button to get a desired reaction.”
मोटीवेशन प्रेरणा म्हणजे लोकांना प्रेरीत करण्याची किंवा स्वतःला प्रेरीत करण्याची एक कला ज्यामुळे आपण एखादं अपेक्षित काम करायला लागतो. असं काही योग्य बटन दाबतो की ज्यामुळे योग्य अशीच प्रतिक्रिया उमटते. विजेचं बटन दाबलं तर दिवा लागतो आणि पंख्याचं बटन दाबलं तर पंखा चालू होतो.
क्लारेन्स फ्रान्सीस माजी अध्यक्ष जनरल फुड्स (U.S.A.) यांनी एकदा मोटिवेशन म्हणजे काय याबद्दल अत्यंत बोलकी प्रतिक्रिया नोंदवली होती ती अशी.
You can buy a mans time you can buy a man’s physical presence at a given place, but you cannot buy his initiative, you cannot buy loyality. you have to earn these things.”
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
