प्रेरणा म्हणजे काय ?

७. प्रेरणा ही व्यवस्थेवर अलवंबून असते

कोणतीही प्रेरणा ही त्यावेळी काय व्यवस्था म्हणजे System अस्तीत्वात आहे यावर बरीच अवलंबून असते. आता ही व्यवस्था म्हणजे काय तर परिस्थिती समजा. ती व्यक्तीगत, संस्थात्मक किंवा सामाजिक अशी काहीही असू शकते. प्रेरणा ही तीन व्यवस्थेवर अवलंबून असते.

१. एक शक्ती जी माणसामध्ये स्वतःमध्ये असते. अर्थात ही शक्ती म्हणजे त्या माणसाची गरज आवड, तत्वे होत.

२. तुमच्या संस्थेतील वातावरण माणूस ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणीची व्यवस्था ही देखील प्रेरणा या घटकाला मोठ्या प्रमाणात जबाबदार असते यात संस्थेची रचना, कार्य आणि सहकारी यांचे संबंध, कामाचं स्वरुप आणि परिस्थिती या सगळ्यांचा समावेश होतो.

३. बाहेरील वातावरण हा तीसरा देखील प्रेरणा देण्याच्या बाबतीतील महत्वाचा घटक आहे. यामध्ये लोकांची संस्कृती प्रथा, परंपरा, रुढी, सामाजिक मूल्य यांचा समावेश होतो.

थोडक्यात काय तर तुम्हाला चांगलं काम करुन पाहीजे ना मग माणसाला काय पाहीजे संस्थेला काय पाहीजे आणि समाजाला काय पाहीजे यांचा चांगला ताळमेळ साधा आणि ज्याला ज्यातून प्रेरणा मिळेल ते ते त्याला देऊन टाका आणि कामाला लागा, कामाला लावा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!