प्रेरणेची मुलुखावेगळी उदाहरणे
मला वाटतं जगाच्या पाठीवर आपल्या लोकांना एवढी मोठी बक्षिस देणारा कोणी व्यवस्थापक, मालक राजा अजुन जन्माला आला नाही आणि पुढील ५००० वर्षात जन्माला येईल असेही सांगता येत नाही. महाराजांच्या या प्रेरणादायी योजनामुळेच अनेक कर्तबगार माणसं अगदी कमी कालावधीत महाराजाभोवती गोळा झाली. आणि जगातील सर्वात मोठे मोटीवेशन गुरु म्हणूण महाराज प्रसिद्ध झाले. अहो आज लाखो करोडो रुपये
दिले तरी लोक मरायला तयार होणार नाहीत. पण महाराजांची योजना पहा किती मोठी की लोक मरणं समोर दिसताना म्हणायचे महाराज ही संधी मला द्या. आपल्या स्वराज्यासाठी मृत्यूला भीक न घालणारे हे लाखो मावळे महाराजांच्या मोटीवेशन पॉलीसीतूनच जन्माला आले हे विसरता कामा नये.
मोटीवेशन संदर्भात आणखी एक उदाहरण आपणाला पहायला मिळतं आणि तेही रायगडासंदर्भातीलच. गडावर दूध घालण्यासाठी आलेली एक गवळण रायगड पाहण्यात दंग राहिली आणि तेवढ्यात सूर्य मावळला म्हणून रायगडचा महादरवाजा बंद झाला.
आता सकाळ झाल्याशिवाय रायगडाचा दरवाजा कोणत्याही परिस्थितीत उघडला जाणार नव्हता. आणि या गवळणीचे लहा मूल पाळण्यात होते. कोणत्याही परिस्थितीत या गवळणीला आता त्या मुलासाठी गड उतरावाच लागणार होता आणि तोही गडाचा दरवाजा न उघडता स्वराज्याचा नियम मोडून. नियम असा होता की सूर्यास्त झाल्यावर खालून कोणी वर येऊ शकत नाही आणि वरुन कोणी खाली जाऊ शकत नाही. हे झालं दरवाजाचं आणि इतरही कोणत्या प्रकारे जर हा नियम तुटला तर एकच शिक्षा होती कडेलोट, मृत्यूदंड टकमटोकाची भेट.
हे सगळं माहित असताना त्या गवळणीने मुलाच्या प्रेमापोटी एका कड्यावरुन गड उतरण्याचा निर्धार केला. चंद्र प्रकाशात तिने आपला मार्ग निवडला आणि ती गड उतरली सुद्धा. इकडे दुसऱ्या दिवशी पहारेकरी आणि किल्लेदार याची शोधाशोध आणि पळापळ सुरु झाली. गडाचा दरवाजा बंद असताना गवळण गेली कुठे ? नंतर कळले की गवळण रात्रीच कडा उतरुन आपल्या घरी गेली आणि सुखरुप आहे. एव्हाना ही बातमी गुप्तहेरांनी महाराजांना सांगितली. महाराजांनी त्या गवळणीला बोलावून घेतलं.
दरबार भरविला आणि सांगितलं ताई तुझ्यासारख्या हिंमतबाज भगिनी माझ्या स्वराज्यात आहेत म्हणूनच हे स्वराज्य अजिंक्य आहे. प्राणाची भिती न बाळगता तू मुलाच्या काळजीने जीव मुठीत घेऊन अंधाऱ्या रात्रीत गड उतरुन गेलीस मोठे धाडस केलेस. ज्या कड्यावरुन तू उतरुन गेलीस त्या कड्यालाच आम्ही आता तुझे नाव देऊ. महाराजांनी तिचा चोळी, बांगडी आणि पैसे देऊन सत्कार केला आणि हिरोजी इंदलकरांना लागलीच आदेश दिला त्याच ठिकाणाला आणखी अभेद्य करण्यासाठी कडे तासून बुरुज बांधा आणि त्याला नाव द्या हिरकणी बुरुज.
या धाडसी गवळणीच्या धाडसाची आठवण जगाला कायम रहावी जोपर्यंत जगाच्या नकाशावर रायगड तोपर्यंत या ताईचे हे धाडस जगाला प्रेरणा देत राहील. सांगा जगाच्या
पाठीवर अशी कोणती कंपनी, संस्था आहे की जिने आपल्या लोकांचं नाव एखाद्या युनिटला किंवा प्लांटला दिलं आहे. कंपनीला फक्त मालकाचं नाव असतं. कितीही शाखा उघडल्या तरी. आणि इथे मात्र महाराज राजधानीच्या गडाच्या एका बुरुजाला हिरकणीचं नाव देऊन समस्त स्त्री शक्तीला प्रेरणा देतात त्यांच्या शौर्याचं चिरस्थायी कौतुक करतात. म्हणुनच महाराज जगाचे मॅनेजमेंट गुरु आहेत यात शंका नाही.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
