५५.१००% लक्ष केंद्रित कसे करावे ? : Focus
फोकसबद्दल असं म्हटलं जातं. You can achieve Anything in life. But you can’t achieve EVERYTHING in life. म्हणजेच मोठ्या यशासाठी एका वेळी फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित करा. त्यावेळी तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. आताच्या तरुणांना त्यांच्या अभ्यासावर, त्याच्या करिअरवर फोकस करायचा असेल. तर सर्वप्रथम एकाग्रचित्त म्हणजे फोकस असणे जरुरी आहे. त्यासाठी लांब श्वास घेऊन ध्यानधारणा करा. ध्यानधारणा करताना तुमचे सर्व लक्ष तुमच्या श्वासावरच ठेवा. त्याद्वारे तुम्ही समोर येणारे डिस्ट्रक्शन म्हणजे अडथळे बाजूला करू शकता. जेव्हा तुमचा फोकस एकाच कामावर असतो त्यावेळी डिस्ट्रक्शन अडथळे त्याला दिसतच नाहीत. डिस्ट्रक्शन मध्ये सोशल मीडिया, इंस्टाग्राम वरील रील, फेसबुक, व्हॉट्सअप, टीव्ही, नेट फ्लिक्स अशा अनेक गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या ध्येयावर फोकस करू शकत नाही. तुमचा फोकस वाढविण्यासाठी तुम्ही पामोडोरो ब्रेक मेथड वापरा. त्यामध्ये तुम्ही २५ मिनिटं लक्ष देऊन काम करा आणि ५
मिनिटाचा ब्रेक घ्या.
मायक्रोसॉफ्ट कंपनीने एक सर्वे केला, त्यामध्ये लोकांचा फोकस हा ९० मिनिटांचा असतो. तो तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न आणि सराव करून वाढवू शकता. सचिन तेंडुलकर, एलन मस्क, मायकल जॅक्सन हे त्यांच्या कामावर इतका फोकस कसे करू शकतात. तर ते फोकसची प्रॅक्टिस करतात. म्हणून त्यांची ऑब्झर्वेशन लेव्हल फार वरती असते. म्हणूनच म्हणतात परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट.
जीवनात फार मोठे यश मिळवायचे असेल ना, तर, कोणतेही कारण न सांगता, आपल्या ध्येयावर, आपल्या कामावर अन कंडीशनली फोकस करा. आणि जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
