५६.आपला जन्म जगण्यासाठी का जिंकण्यासाठी?
स्वप्न आणि ध्येयामध्ये फार मोठा फरक असतो. स्वप्न हे फक्त पाहता येते. स्वप्नात तुम्ही चंद्र तारे पण तोडून आणू शकता. कारण स्वप्नाला दिशा नसते, पण ध्येयाला एक विशिष्ट दिशा, एक Clear Vision असते. यशस्वी जीवन जिंकण्यासाठी ५ D म्हणजे Destination, Devotion, Determination, Discipline, Deadline. म्हणजेच ध्येय, समर्पितपणा, दृढनिश्चय, शिस्त आणि समय सीमा लागते. तसेच ३ C म्हणजे Confidence, Courage & Cash अर्थात आत्मविश्वास, ध्येय आणि पैसा लागतो.
एक मुलगा नदीत बुडू लागला. त्याने वाचवा, वाचवा असा आवाज दिला. तेव्हा काठावरच्या एका व्यक्तीने पाण्यात उडी मारून त्याला वाचवले आणि तो जायला निघाला. तेव्हा मुलगा म्हणाला, मी तुमचे उपकार या जन्मात विसरणार नाही, कारण तुम्ही मला पुनर्जन्म दिला आहे. तेव्हा त्या मुलाच्या डोळ्यात डोळे घालून ती व्यक्ती म्हणाली, मुला तू जेव्हा मोठा होशील ना ! तेव्हा तू हे सिद्ध कर, की तुझे जीवन वाचविण्याच्या लायक होते. तू फक्त जगण्यासाठी जगू नकोस् तर जिंकण्यासाठी जग. तुझे आईवडील, गुरुजन आणि समाजाला अभिमान वाटेल असे कार्य कर.
परमेश्वराने आपल्याला तीक्ष्ण बुद्धी आणि एकमेव वाचा असलेला अत्यंत दुर्मिळ मनुष्य जन्म दिला आहे. आपल्या देशात दर सेकंदाला २ व्यक्ती मरतात. म्हणून जोपर्यंत जगायचं तोपर्यंत बडी सोच, कडी मेहनत, आणि पक्का इरादा ठेवून एक यशस्वी आणि आनंदी जीवन जगा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
