महाराजांचे लष्कर व्यवस्थापन

महाराजांचे लष्कर व्यवस्थापन

महाराजांनी कोणत्याही किल्ल्यावर ५०० पेक्षा जास्त सैनिक ठेवू नयेत असा नियमच तयार केला होता. अगदी मोठ्यात मोठ्या किल्ल्याला हा नियम असल्यावर छोट्या छोट्या किल्ल्यावर तर फक्त २०० ते ३०० अशीच शिबंदी असायची. किल्ल्याच्या आश्रयाने लढणारा एक-एक मावळा शंभर गनिमांना भारी पडला पाहिजे या रणनितीने मोर्चेबांधणी केलेली असायची आणि तशा प्रकारचे प्रशिक्षण मावळ्यांना दिलेले असायचे. शत्रु प्रचंड संख्येने आणि दीर्घकाळ वेढा घालून बसला तर बाहेरच्या अंगाने घोडदळ त्यावर छापा घालून त्यांना हैराण करायचे. त्यामुळे किल्ल्यावरील दोनशे आणि तीनशे लोक आणि अचानक हल्ला करणारे घोडदळ यामुळे शत्रुची चांगलीच कोंडी व्हायची. तेवढ्यात किल्ल्यावर आणखी शिबंदी पोहोचवणे, रसदेची, दारुगोळ्याची व्यवस्था करणे इ. कामे अगदी झटपट केली जायची.
वर्षानुवर्षे एक-एक किल्ला अशा प्रकारे झुंजत ठेवला जायचा. अर्थात हे सगळे घोडदळ आणि किल्ल्यावरील पायदळ यांच्या योग्य त्या समन्वयातूनच शक्य होत असे.

आणि महाराज या लष्करी नियोजनात खूप वाकबगार होते. म्हणूनच महाराज अगदी छातीठोकपणे सांगायचे, “माझा एक-एक किल्ला एक-एक वर्षे सहज झुंजविन. गनिमाला मग तीनशे साठ किल्ले घेण्यासाठी किती वर्षे लागतील ते त्यांनी ठरवावे.”

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!