महाराजांचे लष्कर व्यवस्थापन

महाराजांचे लष्कर व्यवस्थापन

 घोडदळातील सरदार

सैन्यात मोठ्या संख्येने कुणबी (मराठा) होते. त्याच्या खालोखाल रामोशी,
महार, जातीचे मावळे होते. महाराजांनी कर्तबगारी पाहूनच मावळा युवकांना सैन्यात चाकरी दिली. घोडदळातील काही सरदारांची नावे पुढील प्रमाणे :- नेताजी पालकर,

मानाजी मोरे, रुपाजी भोसले, खंडोजी जगताप, धनाजी जाधव, नेताजी काटकर, दादाजी कांकडे, निळोजी काठे, संताजी घोरपडे, तुकोजी निंबाळकर, खांडेकर, निंबाजी पाछोळे, गणोजी शिर्के, कृष्णाजी पवार, कृष्णाजी घाटगे, बनाजी बिर्जे, मनाजी मचाळे, कानोजी दिवेकर, आपाजी तांबे, जयसिंग पालकर, हरजीराजे पहाडिक, खंडेराव दाभाडे, खंडोजी आटोळे, दरेकर, कान्होजी आंग्रे, नलगे, घोरपडे, गाढवे, पानसंबळ, येसाजी थोरात, नेमाजी शिंदे, खाजणकर, सोमवंशी, इंगळे, सेलके, देवकते, सिताळे, खांडेकर, पांढरे, कडू, कोकाटे, ढमढरे, बांडे, उचले वगैरे अनेक सरदार होते. या शिवाय महाराजांच्या संरक्षणासाठी खास सुरक्षापथक होते. या पथकात महार, चांभार, मांग व मुस्लिमही होते. त्यात दोन हजार अगदी निवडक शूर शिपाई होते. स्वारीच्या वेळी ते महाराजांबरोबर असत.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!