६३.’४ E’चा फॉर्म्युला
४) चौथा E आहे Ethics म्हणजे नीतिमूल्य किंवा नैतिकता
नीती, नियम आणि सिद्धांताने काम केल्यास नक्कीच यश मिळते आणि ते टिकते पण, हा सिध्दांत सांगतो. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे ज्ञान घेऊन, परीक्षा पास करून अनुभव ही घेतला; परंतु सरकारी नियम व सामाजिक
नैतिकता सोडून व्यवसाय करायला गेलात तर फायद्यापेक्षा नुकसानच होत असते. समजा तुम्ही डॉक्टर झालात आणि दवाखाना सुरू केला आणि तिथे बोर्ड लावला की इथे गर्भलिंग निदान चाचणी करून मिळेल. असे करून चालेल का? तुमचा दवाखाना तर बंद होईलच पण तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. कारण तुम्ही इथीकल म्हणजे नीती, नियम आणि सिद्धांताने बिजनेस केला नाही. म्हणून व्यवसायात यशस्वी होण्यासाठी या चारही E मधला शेवटचा Ethics अत्यंत महत्त्वाचा आहे. हा ४ E चा फॉर्मुला तुम्ही समजून त्याप्रमाणे कार्य करा, तुम्हाला प्रचंड यश मिळेल हा माझ्झा स्व अनुभव आहे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
