महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती
बाजी प्रभु बारा मावळातील भोर प्रांतांचे त्यांच्या सोबत असलेले ६०० मावळे बांदल घराण्याचे त्यांच्या दोन तुकड्या केल्या. ३०० मावळे महाराजांसोबत व ३०० मावळे बाजी प्रभु देशपांडे सोबत अशी विभागणी केली गेली. निघताना महाराजांनी बाजीला सिद्धीची फक्त वाट रोखुन धरण्याचे सांगितले. आम्ही सुखरुप गडावर पोहोचलो की तोफांचे पाच बार उडवुन इशारा दिल्यावर तुम्ही सुरक्षित माघार घेत जंगलात पसार व्हावे अशी सुचना केली. अर्थात घोडखिंड ते विशाळगड हे अंतर फक्त १२ कोसाचे. धावत्या फौजेनिशी महाराजांना जो वेळ लागला असता तो एक ते दिड तासांचा आणि म्हणुन महाराजांनी बाजीला तशी सुरक्षित माघार घेण्याची सुचना दिलेली.
परंतु इकडे महाराजांनी खिंडीतुन सुखरुपपणे किमान वेळेत प्रवास करुन विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचले खरे. परंतु पहातात तो काय सुर्यराव सुर्वे आणि जयंवतराव दळवी नावाच्या आदिलशाही परंतु मराठा सरदारांनी विशाळगडालाच वेढा टाकलेला.
महाराजांसोबत असणाऱ्या ३०० मावळ्यांनी जिवावर उदार होऊन प्राणाचे बलिदान देऊन वेढा फोडण्याचा निकाराचा प्रयत्न केला. सुर्वे आणि दळवी सुद्धा मराठी मातीतलीच राकट माणसे. वेढा काही केल्या फुटत नव्हता. महाराजांच्या ३०० मावळ्यांनी अगदी घमासान करीत ७ तास संघर्ष करून अखेर वेढा फोडला. इकडे घोडखिंडीत महाराज इशारा का करीत नाहीत ? याचा विचार बाजी प्रभुला आणि जोपर्यंत इशारत होत नाही तोपर्यंत आपण गनिमाची वाट रोखावी हा आदेश बाजी प्रभू आणि त्यांच्या सोबत असणारे ३०० बांदल वीर सोबत फुलाजी, सिद्धी इब्राहिम व सिद्धी वाहवाह आणि शिवाजी महाराजांचे सख्खे मामा अचलोजींचा मुलगा संभाजीराव जाधव. ही सर्व मंडळी सिद्धीच्या एका पाठोपाठ येऊन थडकणाऱ्या टोळधाडीला रोखताना धारातिर्थी पडले. मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या लढाईत कधीच एवढा वेळ झुंज देण्याची वेळ आली नव्हती.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
