गरुडझेप
माझा मराठाचि बोलू कौतुके।
परि ते अमृतातेही पैजा जिंके।
ऐसे अक्षरे रसिके। मेळवीन ।।
या श्री ज्ञानोबा माउलींच्या ओळी जागवीत मी माझा हा लेखनयज्ञ मांडला आहे. माउलींनी म्हटल्याप्रमाणे अमृताशीही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेतून हा माझा यज्ञ आहे. अक्षरांना योग्य कोंदणात बसविले, की अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्यातून वाक्य आणि त्या वाक्यांतून पानेंच्या पाने तयार होऊन पुस्तकाची निर्मिती होते. मीही माझ्या अनुभवांची अक्षरजुळवणी करून व त्या अक्षरांना योग्य कोंदणात बसवून शब्दनिर्मिती व त्यातून पुस्तकाची निर्मिती केली आहे, ती आत्मचरित्राच्या माध्यमातून. याला आत्मकथन म्हटले, तरीही ते वावगे ठरणार नाही. यात आत्मप्रौढी नाही, आहे ते केवळ ‘मी कसा घडलो?’ याचे सविनय विवेचन ! यात आहे तो खाचखळग्यांतून केलेला जिद्दीचा प्रवास, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या म्हणीचे प्रत्यंतर आणून देण्यासाठी केलेला सायास अन् सुखाचे कण शोधण्यासाठी अनवाणी पायांनी दगडगोट्यांतून चालण्याचा केलेला कष्टाळू प्रयास ! सरस्वतीपूजनापासून सुरू झालेली ही माझी वारी लक्ष्मीच्या पंढरीला येऊन पोहचली. तीच वारी मी या ग्रंथात शब्दबद्ध केली आहे.
मी लहानपणापासून शिवोपासक ! अर्थात महादेवाचा उपासक किंवा भक्त! ‘ॐ नमः शिवाय’ हा माझा मंत्र नि ‘हर हर महादेव’ हे माझे गान! ‘ज्ञानोबा माउली’ अन् ‘तुकोबा साउली’ हे घरचे उपचारी अन् संस्कारी वातावरण! या वातावरणात मी लहानाचा मोठा झालो. आजीआजोबांची ‘प्रेमळछाया’, आणि आई-वडिलांची ‘आभाळमाया’ अशा ‘छायाळू’ आणि ‘मायाळू’ छत्राखाली बालपण आणि काही अंशी तरुणपण गेले. मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातले ‘मांडवा’ हे माझे जन्मगाव. गेली अनेक दशके मराठवाड्याने दुष्काळाशी विवाह केला नि काडीमोड न घेता त्या दोघांचा संसार आतापर्यंत अव्याहतपणे सुखनैव चालू आहे. मराठवाड्यातील माणसे म्हणजे या संसारवेलीवर आलेली फुलेच! न खचता, न डगमगता या फुलांनी मकरंद (मध) देण्याचेच काम केले आहे. त्यामुळे परिस्थितीशी टक्कर देणारा आमचा कणा अन् खंबीरपणाने जगणे हा आमचा बाणा हे अद्वैत आहे. अन् ही बावच माझे जीवन यशस्वी करणारे गमक असावे. जीवनात सारेच यशस्वी होतात असे नाही; परंतु जे जिद्दीने धावतात, ते ‘भोज्या’पर्यंत पोहचतात एवढे मात्र निश्चित! आमचे मांडवा गाव म्हणजे खेडेच! गावात त्या काळी तसे शैक्षणिक वातावरण नव्हते, जसे ते शहरात असते. पण कसलीच खंत बाळगली नाही. ‘आम्ही किवा आमचे अपत्य शिकले नसले, तरी आपल्या नातवांनी शिकून खूप मोठे व्हावे’ अशी आजोबांची खूप इच्छा व तळमळ. ती तळमळ त्यांच्या बोलण्यातून वारंवार व्यक्त व्हायची. आजीही निरक्षर ! परंतु साक्षरतेचे ‘महत्त्व’ आणि शिक्षणातले ‘सत्त्व’ ती चांगलीच जाणून होती. शाळा किंवा विद्यालय हे शब्दच ज्या काळात प्रचलित नव्हते, त्या काळात आपेगावच्या वाळीत टाकलेल्या संन्याशाचा मुलगा ‘ज्ञानोबा’ होऊन
भगवद्गीतेचे ज्ञान सर्वसामान्यांना प्राकृतातून देतो, अन् देखा वाणी ‘तुकोबा’ होऊन अभंगांतून, कीर्तनांतून विज्ञानाचा आध्यात्मिक व्यापार करतो, हे आजी आजोबा ओळखून होते. त्यामुळेच आपल्या नावांनी आमच्या पाच भावांत मोठ्या प्रमाणात माझाच कल शिकण्याकडे ज्ञानप्राप्तीकडे होता आणि मी ज्ञान शिकावे, शहाणे व्हावे, असे त्यांना वाटायचे.
तिलो. आपल्या नावाने शिकूनसवरून मोठा साहेब व्हावे आणि जीपमध्ये बसून गावाला येऊन ते जिप आपल्या घरासमोर उभे करावे. आजोबांचा सरधोपट विचार खूप शिकल्यानंतर असे होऊ शकते, ही त्यांनी मनोमनी त्यांचे विचार काहीही असोत. परंतु त्या विचारांतून चांगल्या शिक्षणाचे बीजारोपण माझ्या मनामध्ये झालेले मात्र खरे. त्या बीजांना अंकुर फुटल्यानंतर मी त्यांना खतपाणी घातले. कोळपणी व खुरपणी उनशानाचे धनाचे भरघोस पीक घेतले ते पढ़े विविध प्रसंगांतून दिसुन येणारच आहे. सातवीपर्यंतने शिक्षण मांडवा येथे दहावीपर्यंतचे कहा येथे व उच्च शिक्षण औरंगाबाद येथे झाले. मांडवा कडा औरंगाबाद हा माझ्या शिक्षणाचा त्रिकोण ‘त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज ही १८० अंश असते’ हे शाळेत सिद्ध करून दाखविलेले प्रमेय भी तीन शैक्षणिक गावांद्वारे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले. ‘यश’ हे त्या प्रमेयाचे अपत्या महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘स्टेट बैंक ऑफ इंडिया’मध्ये मिळालेली नोकरी ही सरस्वतीआराधनेच्या प्रसादातून माझ्या जीवनात ‘लक्ष्मी’ने टाकलेले पहिले पाऊल तरले. असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. पडे सुनंदाशी विवाह केल्यावर माझ्या घरी ‘भाग्यलक्ष्मी’चे पहिले पाऊल पडले. ‘लक्ष्मी नि भाग्यलक्ष्मीची’ पावले पुढे गावत जाऊन त्यांचे ‘महालक्ष्मी’त रूपांतर झाले. ते कसे होत गेले. हे सारे पुढे विविध घटनांतून येणारच आहे.
दरम्यान पैसा मोठ्या प्रमाणावर कमवावा, त्यासाठी कितीही काष्ट पडले तरी हरकत नाही. ही माझी मानसिकता प्रचळ होत गेली. केवळ बँकेतील नोकरीने आणि त्यातून मिळणाऱ्या पगाराद्वारे ‘खाऊन पिऊन सुखी इतकीच संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकते. हे मला ठाऊक होते; परंतु इतकेच मला मान्य नव्हते. स्वप्ने पाहायची तर मोठीच ही माझी मानसिकता विकसित झाली होती. त्यामुळेच तर ‘पुढे आणिक मेळवावे’ हे मला वाटत होते. त्यातूनच मग नवनवी क्षितिजे मला खुणावू लागली. धडपड कर, अहोरात्र श्रम कर, ‘लाथ मारीन तिथं पाणी काहीन’ हे तुला जमू शकते. तो तुझा स्वभाव आहे. असे माझे मन मलाच म्हणू लागले, त्यातून मग ‘विमा’ नावाचे आणखी एक बीज माझ्या मनात अंकरले जाऊ लागले. त्या बीजातूनच ‘पिअरलेस’ नावाचे रोपटे तयार झाले. स्टेट बँकेची नोकरी करीत करीत पिअरलेस या विमाकंपनीचे काम करू लागल्याने हाती आणखी जास्तीचा पैसा खेळू लागला. विम्याच्या कमाईतूनच पुढे मी आजोबांच्या डोळ्यांपुढेच मांडवा येथील घरासमोर “जिपड’ नेऊन उभे केले. त्या वेळचे आजीआजोबा आणि आईवडिलांच्या डोळ्यांतील कृतार्थतेचे भाव शब्दांत
व्यक्त करता येण्यासारखे नाहीत. शब्द मुके ठरले. आपण मनुष्यजन्माला आलो आहोत, तर काही तरी वेगळे करायला हवे, असे माझे मन मला नेहमीच सांगत आले आहे. तेव्हा मग श्री ज्ञानेश्वर माउलींचे शब्द, विचार आठवतात.
मोलाचे आयुष्य दवडितोसि वायां ।
माध्यान्हीची छाया जाय वेगीं ।॥
अत्यंत मोलाचे असे हे आयुष्य काहीजण निरर्थक गोष्टीत फुकट घालवितात. माध्यान्हसमयी जशी छाया नाहीशी होते, तशी ही त्यांची काया केव्हाही नाहीशी होणारी असते.
मनुष्य ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ठ निर्मिती आहे. आपण सर्वांनीच एका बाबतीत स्वतःला भाग्यवान समजायला पाहिजे. आपल्याला मनुष्यजन्म मिळाला यासारखे दुसरे भाग्य असूच शकत नाही. साधुसंत सांगतात त्याप्रमाणे मनुष्यजन्म मिळण्यासाठी ८४ लक्ष योनीतून प्रवास करावा लागतो. त्यानंतरच मनुष्य जन्म मिळतो. नाही तर किड्यामुंग्यांसारखा, जनावरांसारखा जन्म मिळतो. देवाने केवळ आपल्याला मनुष्यजन्मच दिला नाही, तर शरीराने
धडधाकटही बनविले आहे. कारण आजच्या विज्ञानयुगातही जगात जवळपास ३ ते ५ टक्के मुले जन्मतःच अपंगत्वाचे दुःख घेऊन येतात. ही सगळी त्या अज्ञात शफीची लीला असते. अशावेळी परमेश्वराने आपल्याला चांगले स्वास्थ्य, मजबूत हातपाय, डोळे, कान, मेंदू व एकमेवाद्वितीय तीक्ष्ण बुद्धी अशी अनमोल संपली दिलेली आहे. आता एवढे सगळे असल्यावर आणखी देवाकडे काय मागितले पाहिजे? त्याने दिलेल्या या संपतीची व्यवस्थित निगा राखत चांगले, यशस्वी व समाधानी जीवन जगणे एवढे तर आपण निश्चितच करू शकती आपल्या संतांनी सांगितले आहे की, ‘मरावे परि कीर्तिरूपे उरावे’. मी त्यावर म्हणेन की, ‘मरावे नाही तर जगावे परि कीर्तीरूपे’ असे होय. मनुष्यजन्माचे सार्थक करण्यासाठी आपण कष्टाने, प्रामाणिकपणे, जिद्दीने उत्कर्ष साधला पाहिजे. आपल्यासोबत आणखी चार लोकांचे भले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपयशाची तमा न बाळगता जागेपणी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्याचा ध्यास आपण घेतला पाहिजे.
मी स्वतःला तर खूप भाग्यवान समजतो. कारण माझा जन्म अशा देशात झाला, जो जगासाठी मार्गदर्शक आहे. विविधतेने नटलेला आणि तितकाच एकोप्याने बांधलेला हा देश. या देशातही महाराष्ट्रासारखे राज्य, ज्याच्या नावातच महानता आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवासारख्या एका छोटया पण तितक्याच समाधानी वृत्तीच्या, देवभोळ्या लोकांचा वावर असलेल्या गावात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत माझे जग गावाच्या ७ किलोमीटरच्या त्रिज्येत होते. एस.टी. पाहिली होती, पण तिच्यात कधीच बसलो नव्हतो. नंतरच्या आयुष्यात मी आतापर्यंत अर्धे जग फिरून आलो. त्या त्या देशातील संस्कृती, समाजजीवन जवळून अनुभवले. तिथली भौतिक प्रगतीही पाहिली, पण हे सर्व पाहिल्यावर मला आपल्या देशाबद्दल कधीच नकारात्मक वाटले नाही. उलट तिथली एकूण परिस्थिती पाहिल्यावर आपला भारत देश जगात सर्वश्रेष्ठ का आहे हे कळले. भारतातही अनेक राज्यांत प्रवास केला. त्यावरून महाराष्ट्र हे सर्वोत्तम राज्य का आहे, हे मला उमजले. अशा या पावन भूमीत माझा जन्म झाला.
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला यश हवे असते, अपयश कोणालाच नको असते. तरीही ८० टक्के लोक सर्वसाधारण जीवन जगतात व २० टक्के लोक यशस्वी होतात. माझ्या मते यश कोणाही ऐन्यगैऱ्याला मिळत नाही. ते ज्यांना हवे असते त्यांनाच मिळते. म्हणतात ना। आत्म्याची ग्वाही त्रिभुवनात नाही. आंतरात्म्याने ठरविले तर नक्कीच यश मिळते; परंतु त्यासाठी यशाची व्याख्या समजणे गरजेचे असते. विचारवंतांनी यशाची व्याख्या चार भागांत सांगितली आहे. ती म्हणजे ‘कौटुंबिक, शारीरिक, व्यावसायिक व सामाजिक’ अशी यशस्विता होय. कौटुंबिक यशस्विता म्हणजे जन्म झाल्यापासून मरेपर्यंत आपण ज्या वेगवेगळ्या भूमिका जगतो, त्या यशस्वी निभावणे. मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, वडील, आई, आजी, आजोबा इत्यादी. तुम्ही जी भूमिका निभावता ती नंबर एकची निभावली, तरच तिला कौटुंबिक यशस्विता म्हणता येईल. शारीरिक यशस्विता म्हणजे उत्तम आरोग्य निर्माण करणे व सांभाळणे होय. आपण जो व्यवसाय-नोकरी, शेती, समाजकारण, राजकारण, धर्मकारण करतो, त्यामध्ये सवर्वोत्तम यश मिळविणे म्हणजे व्यावसायिक यशस्विता. शेवटची यशस्विता म्हणजे सामाजिक यशस्विता. जन्मभर आपण जे कार्य करतो, ते समाजाच्या हिताचे असेल, त्यालाच सामाजिक यशस्विता म्हणतात.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
