४. एक राजा- एक उद्योजक म्हणून
तुम्हाला एक राजा व्हायचं का? तुमचं उत्तर हो असेल तर पर्यायाने तुम्हाला एक चांगला उद्योजक व्हावे लागेल. एक उद्योजक व्हावं लागेल म्हणजे काय तर तुम्हाला काहीतरी उद्योग-धंदा-व्यवसाय करावा लागेल. आणि कोणताही उद्योग-धंदा-व्यवसाय करावा यासाठी अक्कल लागते आणि पहिली ती अक्कल वाढवावी लागेल. आहे त्या अकलेवर भविष्यातील उद्योगधंदे सहज करता येणार नाहीत. तेव्हा भविष्यासाठी वेगाने तयार व्हावे लागेल. नवनवीन कौशल्ये वेगाने शिकावी लागतील तर राजा होण्यासाठी एक चांगला उद्योजक व्हावं लागेल आणि चांगला उद्योजक होण्यासाठी लागणाऱ्या सहा गोष्टी नीट समजून घ्याव्या लागतील.
शिवबा मी तुला हे सर्व ज्ञान खूप लहान वयात म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षांपासूनच देत आहे कारण माणूस जेवढा जास्त शिकेल जेवढ्या लवकर शिकेल आणि जेवढ्या जास्त वेगाने शिकेल तेवढ्याच वेगाने तो जास्त प्रगती करू शकेल. तेव्हा उद्योजकता ही रक्तात तसेच मेंदूत दोन्ही ठिकाणी बिंबवायला आणि भिनवायला लवकरात लवकर सुरुवात करणं हे केव्हाही चांगलं. मी तुला हे सर्व खूप चांगल्याप्रकारे सहज सांगू शकते कारण मला तसा वारसा आहे. माझे पूर्वज श्रीकृष्ण ते राजा रामदेवराय यादव या सर्वांनी संपूर्ण भारतावर राजा म्हणून राज्य केले आहे. तेव्हा मलाही असे वाटते की तुही संपूर्ण भारतावर राज्य करावे आणि यासाठीच मी तुला खूप कमी वयात लहान असताना हे सगळे प्रौढ लोकांनी समजायची गणिते सांगत आहे.
तर एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी ज्या सात गोष्टी लागतात त्या खालीलप्रमाणे
१) दूरदृष्टी – Vision
२) वेळेचे व्यवस्थापन – Time management
३) संधी शोधण्याची नजर – grabbing apportunities
४) प्रक्रिया – Process
५) माहिती – Data
६) लोक – People
७) मार्गदर्शक – Coach
तर आता आपण एक एक गोष्ट आणि त्यातील मर्म व्यवस्थित समजून घेऊया, दूरदृष्टी म्हणजे काय ते समजण्याअगोदर दृष्टीचे तीन प्रकार सांगते ते समजून घ्या. पश्चात दृष्टी – घटन घडल्यानंतर येते ती वेळ निघून गेल्यावर येते ती मध्य दृष्टी – घटना घडत असताना कळते ती – वेळेतच पहाता येते ती दूरदृष्टी – घटना घडण्याअगोदर जी दिसते ती – वेळ येण्यापूर्वीच पाहू शकते ती.
१. दूरदृष्टी – दूरदृष्टी म्हणजे Vision. दूरदृष्टी म्हणजे भविष्यात काय काय होऊ शकेल यांचा अंदाज बांधणे आणि त्याप्रमाणे कृती करणे. दूरदृष्टी असेल तर आणखी एक गोष्ट कळते आणि ती म्हणजे आपल्या संधीच्या, भविष्याच्या आड येऊ शकणारी संकटे.त्यामुळे दूरदृष्टीचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे संधी कळणे आणि दोन म्हणजे आपल्या संधीच्या आड येणारी संकटे किंवा समस्या. तर अशा वेळी आपण काय करावे तर दोन योजना बनवाव्या. Plan -A and Plan-B. Plan -A हा संधीपर्यंत जाण्यासाठी असावा आणि Plan-B हा संधीच्या आड येणारी संकटे आणि समस्या यांचे निवारण करण्यासाठी असावा.

तुम्हाला जर राजा म्हणून उदयाला यायचे असेल तर नेहमी Vision दूरदृष्टी ही गोष्ट कायम Update ठेवा. यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक संधी तर मिळणारच आहेत. परंतु त्याचवेळी भविष्यात येणाऱ्या अनेक संकटांपासून सावधानतेचा इशारा मिळणार आहे आणि तसं तुम्हाला ते संकट टाळण्यासाठी तयारी करायला वेळ मिळणार आहे. तेव्हा दूरदृष्टीचा हा असा दुहेरी फायदा आहे. एक तर संधी प्राप्त करण्यासाठी आणि दुसरे म्हणजे संकटे टाळण्यासाठी.
यातूनच पुन्हा तुमच्या SWOT analysis चा उदय होतो.
S strength ताकद
W – weakness – कमजोरी
O – opportunities – संधी
T-Threats – धोका
तुमची ताकद ही तुम्हाला संधी मिळवून देऊ शकते आणि तुमची कमजोरी ही तुम्हाला धोक्यात टाकू शकते. तेव्हा ज्या माणसाकडे दूरदृष्टी आहे तो ताकदीच्या जोरावर संधी मिळवत तर राहतोच पण त्याचवेळी तो कमजोरी कमी कमी करायचा प्रयत्न करून भविष्यातील धोके सुद्धा कमी करत जातो आणि हमखास यश मिळेल असे पाहतो. तेव्हा आपणाला यशस्वी होण्यासाठी हाच एक मार्ग आहे. ताकद वाढवत रहा – संधी मिळत जातील. कमजोरी कमी करत जा धोके टळत जातील.तुम्हाला केवळ संधी मिळाली आणि त्यात अजिबात धोका नसेल तर यशाची शक्यता १००% आहे. पण जर संधीच्या सोबतच काही संकटे असतील तर मग यशाची शक्यता ५०-५०% होते. म्हणजे शक्यता ही पण असते आणि शक्यता ती पण राहते. तुम्ही जिंकू शकता जर ताकद वाढवत गेलात आणि धोके कमी करत गेलात तर आणि तुम्ही पराभवाकडे जाऊ शकला जर तुम्ही धोके टाळले नाहीत किंवा धोक्याकडे दुर्लक्ष केले तरी कोणत्याही धोक्याला छोटा-मोठा समजण्याची चूक करू नका. धोका हा धोका असतो. जो गुणधर्म वणव्यात
असतो तोच गुणधर्म एका आगीच्या काडीत असतो. जो गुणधर्म समुद्राचा असतो तोच गुणधर्म थेंबभर पाण्याचा असतो. तेव्हा एखादी मोठी वस्तू जाळण्यासाठी जशी एक काडी पुरेशी ठरते तसेच एक मोठे जहाज बुडण्यासाठी एक छोटे छिद्र पुरेसे ठरते. त्यामुळे कायम सावध रहा. सतर्क रहा. भविष्याकडे पाहत पाहत आपली ताकद वाढवत रहा आणि कमजोरी कमी कमी करत चला. दूरदृष्टी या शब्दाचे आणखी काही अर्थ होतात. तेही मी तुम्हाला सांगते ते ही राजे नीट लक्षात घ्या. जेणेकरून तुम्हाला वेगाने वाटचाल करता येईल आणि आपले ध्येय सहज प्राप्त करता येईल. तर तुम्हाला स्वराज्य किंवा स्वतःची एखादी कंपनी काढून तिचे रुपांतर जर एका मोठ्या कार्पोरेशनमध्ये करावयाचे असेल तर मग हे त्यातील तीन अर्थ समजून घ्या.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
