४. एक राजा- एक उद्योजक म्हणून
५. माहिती संकलन करा. Date base बनवा.
काल आपण आजपर्यंत केलेली यशस्वी कामे आजपर्यंत फसलेली कामे याची नोंद ठेवा. तसेच इतर लोकांनी यशस्वी केलेली कामे आणि इतर लोकांची फसलेली कामे यांची माहिती संकलन करा. आपली चूक परत
करायची नाही. आणि शत्रूने, स्पर्धकाने केलेल्या चुकीची आपण अभ्यास करून त्यातून संधी कशा निर्माण होतील ते पहावे. किती Input दिल्यावर किती output मिळतो याची माहिती हाताशी असेल तरच आपणाला पुढील नियोजन करणं सोपं जाईल. माहितीशिवाय किंवा अपूर्ण माहितीसह किंवा अर्धवट माहितीच्या आधारावर केलेलं नियोजन महागात पडू शकते. म्हणून आपणाकडे योग्य data माहिती असेल तर मग ती Filter करून छाननी करून त्यातील अनावश्यक ती काढून टाकून आवश्यक ती घेऊन पुढील दिशा ठरविता येईल. तेव्हा सतत आपली आणि शत्रूची सुद्धा माहिती संकलन करा, त्याचे वर्गीकरण classification करा. त्याचे विश्लेषण Analysis करा. आणि मगच निर्णय घ्या. असा घेतलेला निर्णय १००% यश मिळवून देऊ शकतो. त्यासाठी माहिती पूर्ण घ्या, ताजी माहिती घ्या आणि मग ताबडतोब कृती करा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
