७२.पैशाचे व्यवस्थापन
Money management
१) बचत करायला शिका –
नासधूस कमी केली की बचत वाढते, हा साधा सिद्धांत समजून घ्या. मी ४४ वर्षांपूर्वी स्टेट बँकेत नोकरीला लागलो. त्यावेळी मला पहिला पगार ७७० रुपये मिळाला. त्यापूर्वी मी २५ रुपये भाड्याच्या खोलीत राहत होतो. मला बँकेने तीन खोल्यांचा मोठा क्वार्टर देऊ केला, परंतु त्या बदल्यात माझा HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स कट होणार होता. मला आणि माझ्या पत्नीला एवढ्या मोठ्या घराची गरजच नव्हती, म्हणून मी एका खोलीत राहून ७५ रुपये महिन्याला वाचवले. माझे सहकारी मोटरसायकलवर बँकेत येत असताना, मी दोन किलोमीटर पायी जाऊन मोटरसायकलचा हप्ता आणि पेट्रोलच्या खर्चाची बचत केली. तिथूनच माझ्या जीवनातील बचतीला सुरुवात झाली. अशा छोट्या छोट्या गोष्टी मधून तुम्हीही चांगली बचत करून आणि योग्य
ठिकाणी गुंतवणूक करून तुम्ही अधिक श्रीमंत होऊ शकता.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
