७२.पैशाचे व्यवस्थापन
Money management
३) एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करू नका-
माझा सल्ला राहील, की ज्या क्षेत्राची तुम्हाला माहिती नाही, अभ्यास नसेल अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका. सहा महिन्यांत, एका वर्षात दुप्पट करून देणारे, तुमचे मित्र, नातेवाईक आले तरीही अशी चूक करू नका. नसता तेलही गेले आणि तूपही गेले हाती धुपाटणे पण राहणार नाही. सर्वात सुरक्षित गुंतवणूक ही २४ कॅरेट सोन्यात करा. त्यानंतर रियल इस्टेट मध्ये करा. मार्केटचा अभ्यास करून किंवा योग्य सल्लागाराच्या मदतीने म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये पण तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायातही गुंतवणूक करून तुमचे उत्पन्न वाढवा. पण एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करू नका.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
