८. ध्येयप्राप्तीची तयारी करा.

८. ध्येयप्राप्तीची तयारी करा.

७. प्रशिक्षणाच्या ताकदीवर विश्वास ठेवा – believe in the power of training.

राजे हा मी तुम्हाला सांगत असलेला ध्येयाकडे नेणारा परंतु सर्वात महत्त्वाचा असा हा मंत्र आहे. आपणाला जर आपले अपेक्षित ध्येय गाठायचे असेल तर सतत आपली ताकद आपली उत्पादकता आपली क्षमता वाढवत गेलं पाहिजे. आणि यासाठी आवश्यक असते ते प्रशिक्षण. प्रत्येक क्षणाला कामी येतं ते प्रशिक्षण, यासाठी आपल्या आयुष्यातील मोठा वेळ शिकण्यासाठी बाजूला काढून ठेवा. जो जेवढा जास्त शिकतो तो तेवढीच जास्त प्रगती करतो. तेव्हा ज्याला जेवढं मोठं यश मिळवायची इच्छा आहे त्याने तेवढा जास्त वेळ हा प्रशिक्षणासाठी देणं गरजेचं आहे. मला शिकायलाच नवीन गोष्ट शिकायलाच वेळ नाही असं म्हणणाराच काही भवितव्य शिल्लक राहू शकत नाही. तेव्हा जो शिकेल तोच टिकेल. जो जास्त शिकेल तोच जिंकेल हा मंत्र लक्षात ठेवा.

जर तुम्हाला मोठं युद्ध नको असेल तर नेहमी मोठ्या युद्धाची तयारी ठेवा. तुम्ही तयार आहात हे शत्रूला माहित असेल तर तो युद्धच करणार नाही. तेव्हा तुमची ताकद कशात आहे तर ती प्रशिक्षणात. तेव्हा आपण आणि आपले सैन्य हे नेहमी प्रशिक्षित ठेवले गेले पाहिजे. शत्रूपेक्षा, स्पर्धकापेक्षा काकणभर श्रेष्ठ आणि अद्यावत असेच प्रशिक्षण आपल्या सैनिकांना जर आपण दिले तर आपली उत्पादकता productivity जरूर वाढते. त्यामुळे आपले चांगले प्रशिक्षित असे मूठभर सैनिक शत्रूच्या हजारोंच्या तुकडीला पुरे पडू शकतात, तेव्हा प्रशिक्षण हे राज्याच्या निर्मितीसाठी, अस्तित्वासाठी आणि विस्तारासाठी अशा तिन्ही गोष्टींसाठी आवश्यक आहे. तेव्हा आपला सर्वात जास्त वेळ, सर्वात जास्त फोकस हा सैनिकांच्या प्रशिक्षणावर असला पाहिजे. त्यांच्या प्रशिक्षणावर खर्च झालेले हजारो रुपये उद्या करोडो रुपये कमावून देऊ शकतात. हेच प्रशिक्षित सैन्य अशक्य कोटीतील पराक्रम करून अवघडात अवघड युद्धात आपणाला विजय मिळवून देऊ शकतात. तेव्हा प्रशिक्षणाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि सैन्याला कायम प्रशिक्षित करत रहा. मराठ्यांच्या स्वराज्य निर्मितीत राजमाता जिजाऊंच्या ह्या शिकवणीचा प्रचंड उपयोग झाला. स्वतः राजमाता जिजाऊ आपले लष्करी प्रशिक्षण ६२ व्या वर्षी देखील कायम ठेवतात. तेव्हा त्या ही शिकवण केवळ शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैनिकांना देऊन थांबत नाहीत तर त्या स्वतः ते अंमलात आणतात. शिवाजी महाराजांना सोडविण्यासाठी त्या स्वतः घोड्यावर बसून चिलखत घालून कोल्हापूरच्या दिशेने दौडल्या होत्या. ही घटना आहे जेव्हा नेताजी पालकरांना पन्हाळ्याचा सिद्धी जौहरचा वेढा फोडता आला नाही त्यावेळची. त्यामुळे माणसाने जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत सतत नवनवीन गोष्टी शिकल्याच पाहिजेत हे या प्रसंगातून सिद्ध होते. राजमाता जिजाऊंनी मावळ्यांच्या मुलींना, पत्नींना देखील लष्करी प्रशिक्षण दिले होते. महिलांची स्वतत्रं गृहरक्षक दले (Home guard) प्रत्येक गावागावात तयार केली होती. यामुळेच महाराणी ताराबाई यांच्यासोबत महिलांची एक स्वतंत्र तुकडी लढताना आपणाला दिसते. मराठे कुठे मोहिमेवर परगावी असले तरी मोगलांची मराठ्यांच्या गावात घुसण्याची हिंमत होत नव्हती. कारण आता मराठा स्त्रिया अबला राहिल्या नव्हत्या तर त्या युध्दाचे प्रशिक्षण घेऊन स्वयं रक्षणासाठी सज्ज झाल्या होत्या. या प्रशिक्षणाच्या जोरावरच मराठ्यांनी औरंगजेबाचे सात लाख लष्कर आणि स्वतः औरंगजेब यांना २७ वर्षे या मातीत लोळवलं आणि मराठा राज्य अबाधित राखलं. ही ताकद होती केवळ प्रशिक्षणाची म्हणून प्रशिक्षणाच्या ताकदीवर विश्वास ठेवा. सतत प्रशिक्षण
घेत रहा आणि स्वतःचा विकास करीत रहा. नवनवीन गोष्टी शिका. नवीन गोष्टींवर लक्ष द्या आणि नवीन गोष्टी आत्मसात करा हाच प्रशिक्षणाचा खरा अर्थ आहे. तेव्हा प्रगती करायची तर प्रशिक्षित व्हा. होमगार

 

****************************************************************************************************************************************************************************

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!